Amar Kale Sarkarnama
देश

Amar Kale News : हाथरस घटनेबाबत अमर काळेंचा गंभीर आरोप; आधी चिठ्ठी तर मोदी एक तासाने...

BJP Vs Congress Politics News : पंतप्रधान मोदी किती संवेदनशून्य आहेत. हे मंगळवारी लोकसभेतील त्यांच्या वागण्यावरून दिसून आले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी केला.

Sachin Waghmare

New Delhi : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर संसदेचे पहिलेच अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सर्वच खासदारांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण मंगळवारी लोकसभेत झाले.

यावेळी विरोधकांनी नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना मोठा गदारोळ केला. पीएम मोदींनी काँग्रेस व विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर यावेळी सडकून टीका केली. त्यांनी विविध घटना व घडामोडीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना डिवचले.

माझ्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांचे संसदेत भाषण सुरू असताना त्यांना चिठ्ठी आली होती. मात्र, तरीही ते एक तास भाषण करत राहिले. श्रद्धांजली दिली की लगेच हसून त्यांनी भाषण केले हे संपूर्ण देशाने पाहिले आहे.

पंतप्रधान मोदी किती संवेदनशून्य आहेत. हे मंगळवारी लोकसभेतील त्यांच्या वागण्यावरून दिसून आले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे (Amar Kale) यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेटस नुसार त्यांचे वक्तव्य असावं पण ते आज दिसले नाही. राहुल गांधी यांना बालिश बुद्धी म्हणाले या वक्तव्याचा मी निषेध करतो. मोदींकडून दुसरी अपेक्षाही नाही, असे म्हणत मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावर खासदार काळे यांनी टीका केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेतील भाषण हे अभ्यासपूर्ण होते. मात्र, त्यांच्या भाषणावर पीएम मोदी यांच्यासह सत्ताधारी पक्षाने टीका केली असल्याचा आरोपही यावेळी खासदार काळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT