Mamta Banerjee, Amartya Sen
Mamta Banerjee, Amartya Sen  Sarkarnama
देश

Mamata Banerjee : अमर्त्य सेन यांना जमीन बळकावल्या प्रकरणी नोटीस,बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

सरकारनामा ब्यूरो

Mamta Banerjee criticise On Bjp : नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी विश्व भारती विद्यापीठानं सेन यांना नोटीस पाठवली असून त्यात संबंधित जमीन खाली करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र, आता या नोटिशीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. सेन यांना नोटीस पाठवल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

विश्व भारती विद्यापीठाकडून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना एक नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत सेन यांनी विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करत ही संबंधित जमीन रिकामी करण्याची मागणी करण्यात आली होती.

यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी अमर्त्य सेन यांनी सोमवारी(दि.३०) यांची त्यांच्या बीरभूम येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी सेन यांचं समर्थन केलं आहे. तसेच यावेळी बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

बॅनर्जी म्हणाल्या, अमर्त्य सेन (Amartya Sen) यांना विश्व भारती विद्यापीठानं एक नोटीस पाठवली असून त्यात विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप सेन त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच संबंधित जमीन परत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. सेन यांना नोटीस पाठवत त्यांचा अवमान करण्यात येत असून ते पाहून खूप वाईट वाटलं. त्यामुळे मी व्यक्तीश: तुम्हाला भेटायला आले.

यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना जमिनीचे रेकॉर्ड तपासायला सांगितलं आहे. आम्ही जमिनीच्या मूळ नोंदी शोधल्या असून ती जमीन सेन यांचीच असल्याचं समोर आलं आहे. यावेळी विद्यापीठ प्रशासन खोटं बोलत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाचा अपमान का केला जात आहे? त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शिक्षणाच्या भगवीकरणाऐवजी विश्व भारती विद्यापीठ योग्यरित्या चालवण्यात यावं असा टोलाही भाजपला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT