Sanjay Singh, Anant Vikram Singh Sarkarnama
देश

BJP Ticket 2027 : राजघराण्यातील सासू-सुनेमध्ये भाजपकडून विधानसभा तिकीटासाठी घमासान; माजी केंद्रीय मंत्री अन् त्यांच्या लेकातील वाद चव्हाट्यावर

Amethi Royal Family, Sanjay Singh Amethi, Anant Vikram Singh, Amita Singh, Garima Singh, Shambhavi Singh : भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अमिता सिंह यांचे तिकीट कापत संजय सिंह यांना उमेदवारी दिली. पण संजय सिंह यांचा पराभव झाला.

Rajanand More

Uttar Pradesh Assembly Election 2027 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी तगड्या उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. अनेकजण तिकीटासाठी इच्छूक असून त्यामध्ये अमेठीतील राजघराण्याचाही समावेश आहे. भाजपकडून तिकीट मिळावे, यासाठी माजी केंद्रीय मंत्री संजय सिंह आणि त्यांचा मुलगा अनंत विक्रम सिंह यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संजय सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त अमेठीतील रामनगर येथे नुकत्याच आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांच्या पहिल्या पत्नी गरिमा सिंह यांचे पुत्र अनंत विक्रम सिंह आणि सून शांभवी सिंह यांना पोलिसांनी हाऊस अरेस्ट केल्याचा आरोप होत आहे. अनंत विक्रम यांनी वडील आणि त्यांची दुसरी पत्नी माजी आमदार अमित सिंह यांच्यावर टीका केली आहे.

अमेठीतील राजघराण्यातील हा वाद जुना आहे. संपत्तीसाठी अनंत विक्रम यांनी यापूर्वीच दावा केला आहे. यामागे वडील संजय सिंह यांचा दुसरा विवाह हे कारण आहे. संजय सिंह यांनी पहिली पत्नी गरिमा सिंह यांच्याशी घटस्फोट घेण्याआधीच अमिता सिंह यांच्याशी दुसरा विवाह केला. तेव्हापासून कुटुंबात दरी निर्माण झाली आहे. पतीच्या दुसऱ्या विवाहानंतर गरिमा सिंह पुत्र अनंत विक्रम आणि सून शांभवी यांच्यासोबत वेगळ्या राहतात.

कुटुंबातील हा वाद राजकारणातही आहे. संजय सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. कुटुंबात वाद झाल्यानंतर अनंत विक्रम यांनी २०१४ मध्ये भाजपला जवळ केले. त्यानंतर २०१७ मध्ये गरिमा सिंह यांना भाजपने अमेठी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. त्यांच्याविरोधात अमिता सिंह या मैदानात होत्या. या लढतीत गरिमा सिंह वरचढ ठरल्या. त्यानंतर काही महिन्यांतच संजय सिंह आणि अमिता सिंह यांनीही भाजपची वाट धरली.

भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अमिता सिंह यांचे तिकीट कापत संजय सिंह यांना उमेदवारी दिली. पण संजय सिंह यांचा पराभव झाला. आता २०२७ च्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा या राजघराण्यात राजकीय लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या तिकीटासाठी संजय सिंह हे पत्नी अमित सिंह यांच्यासाठी ताकद लावत आहेत. तर त्यांचे पुत्र अनंत विक्रम सिंह हे पत्नी शांभवी सिंह यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी बाप-लेकामध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT