Amit Shah during his tenure as Gujarat Home Minister before his arrest, highlighting the controversy over his resignation and jail time. Sarkarnama
देश

Amit Shah News : अमित शहांनी अटक होण्यापूर्वी खरंच दिला नव्हता का राजीनामा? किती महिने होते जेलमध्ये?

Amit Shah’s Role as Gujarat Home Minister : संसदेमध्ये बुधवारी काँग्रेस नेत्याने अमित शहांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला शहांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. अमित शाह यांना 2010 मध्ये सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणात अटक झाली होती, परंतु अटक होण्यापूर्वीच त्यांनी गुजरातचे गृहमंत्रिपदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता.

  2. ते जवळपास तीन महिने तुरुंगात होते आणि नंतर जामीनावर सुटले, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार काही महिने गुजरातबाहेर राहावे लागले.

  3. 2014 मध्ये सीबीआय कोर्टाने शाह व इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले, कारण कट सिद्ध झाला नव्हता; आता शाह यांनीच 30 दिवस तुरुंगात राहणाऱ्या मंत्र्यांना पद गमवावे लागेल, असे विधेयक लोकसभेत मांडले आहे.

Gujarat Politics : लोकसभेत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास त्यांना पदावर हटविण्याबाबतची तरतुद असलेले विधेयक सादर केले. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतच शहांच्या अटकेच्या मुद्दा काढत त्यांना डिवचले. शाह गुजरातचे गृहमंत्री असताना एका प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

अमित शाह यांनी विधेयक सादर करताना अटक झाल्यानंतर नेत्यांनी नैतिकता दाखवत पद सोडायला हवे, असे विधान केले होते. त्यावर बोलताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी पलटवार करताना तुम्ही गुजरातचे गृहमंत्री असताना अटक झाल्यानंतर त्यावेळी नैतिकतेचे पालन केले होते का?, असा सवाल केला. त्यावर शहांनी आपण अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याचे खडसावून सांगितले.

कोणत्या प्रकरणात अटक?

अमित शहा हे 2005 मध्ये गुजरातचे गृहमंत्री होते. त्यावेळी 26 नोव्हेंबर 2005 रोजी अहमदाबादमध्ये गँगस्टर सोहराबुद्दीनचे एन्काऊंटर करण्यात आले होते. गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी हे एन्काऊंटर केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आधी सोहराबुद्दीनचा उल्लेख दहशतवादी करण्यात आला होता. त्यानंतर तो गँगस्टर असल्याचे सांगण्यात आले. एन्काऊंटरनंतर पत्नीचाही मृत्यू झाला होता.

या प्रकरणातच गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राजस्थानचे मंत्री गुलाबचंद कटारिया यांचे नाव सीबीआयने आरोपपत्रात घातले होते. या प्रकरणात अमित शहांना अटक झाली होती. त्यांनी अटक होण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता. मोदींनी राजीनामा स्वीकारला होता. त्यानंतर 26 जुलै 2010 मध्ये अमित शहांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांना कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

अमित शाह जवळपास तीन महिने तुरुंगात होते. ते 21 ऑक्टोबर 2010 मध्ये जामीनावर तुरुंगातून बाहेर आले. पण त्यांना अनेक महिने गुजरातबाहेरच राहावे लागले. कोर्टाने 2014 मध्ये शहा व कटारियांसह सर्व 16 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपींनी कट रचल्याचा गुन्हा सिध्द झाला नव्हता.

आता अमित शाह यांच्याकडूनच पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना अटक झाल्यानंतर 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पद गमवावे लागणार असल्याचे विधेयक लोकसभेत सादर केले आहे. त्यासाठी संविधानात दुरूस्ती केली जाणार आहे. त्यामुळे हे विधेयक महत्वाचे मानले जात आहे. विरोधकांनी विधेयकावर आक्षेप घेत केवळ विरोधकांची सरकार पाडण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप केला जात आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: अमित शाह यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली होती?
A: 2005 च्या सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणात त्यांना अटक झाली होती.

Q2: त्यांनी राजीनामा केव्हा दिला होता?
A: अटक होण्यापूर्वीच त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Q3: शाह किती महिने जेलमध्ये होते?
A: ते जवळपास तीन महिने तुरुंगात होते.

Q4: त्यांची निर्दोष मुक्तता केव्हा झाली?
A: 2014 मध्ये कोर्टाने त्यांना आणि इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT