Amit Shah on Satyapal malik:  Sarkarnama
देश

Amit Shah on Satyapal malik: सत्यपाल मलिकांच्या आरोपांना अमित शहांचे उत्तर; म्हणाले...

Pulwama Attack| केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ला झाला, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे

सरकारनामा ब्युरो

Amit Shah Repliedd To Satyapal malik's Alligations | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल असताना ३०० कोटी रुपयांची लाच दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व घटनाक्रमांनंतर राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलवामा हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानेच त्यांना समन्स पाठवण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.तर त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. (Amit Shah Repliedd To Satyapal malik's Alligations )

इंडिया टुडेच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान अमित शहा (Amit Shah) यांनी सत्यपाल मलिक यांच्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपपासून फारकत घेतल्यानंतरच या सर्व गोष्टी आठवल्या का, असा सवाल अमित शहा यांनी मलिक यांना विचारला आहे. सत्तेत असतानाच त्यांचा आत्मा का जागृत झाला नाही? भाजपने लपवण्यासारखे असे काहीही केलेले नाही, सत्यपाल मलिक यांना पाठवलेले समन्स केंद्र सरकारचे नसून सीबीआयचे होते. यापूर्वीही सीबीआयने त्यांना दोन ते तीन वेळा समन्स बजावले आहेत. अशी विधाने करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सत्तेत नसतानाच विवेक का जागतो, असा सवालही अमित शहांनी विचारला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२०१९ मध्ये सीआरपीएफने एअरक्राफ्ट मागूनही गृहमंत्रालयाने त्यांना एअरक्राफ्ट्स दिले नाहीत, त्यामुळेच पुलवामा हल्ला झाला, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला होता. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ला झाला. केंद्र सरकारने (Central Government) सैन्याला एअरक्राफ्ट देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाला.आता या वक्तव्यामुळेच मलिक यांवा बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस आणि आप नेत्यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारला घेरले.

सत्यपाल मलिक यांचे आऱोप

सत्यपाल मलिक यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.सीआरपीएफचा ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही. विमान दिले असते तर हा हल्ला झालाच नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच आपण पंतप्रधान मोदींना आपल्यामुळे जवानांचे प्राण गमावले, असे म्हटलं. पण यावर पंतप्रधानांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. असही मलिक यांनी यावेळी सांगितल. ( National Political News)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT