केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 2009 ते 2013 या कार्यकाळात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा, गडकरी हे अमित शाह यांना भेटण्यासाठी वाट बघायला लावायचे, असं बोललं जातं. याबद्दल प्रश्न विचारल्यवार गडकरी यांनी, "मोठ्या नेत्यांना जास्त वेळ द्यावा लागायचा, म्हणून वाट पाहायला लागायची," असं उत्तर दिलं आहे. नितीन गडकरी यांनी एका 'पॉडकास्ट'ला मुलाखत दिली आहे. तिथे विविध प्रश्नांवर गडकरींनी दिलखुलास उत्तर दिली आहेत.
पक्षाचे अध्यक्ष असताना अमित शाह ( Amit Shah ) यांना 'वेटिंग'वर ठेवलं होतं का? हा प्रश्न विचारल्यावर गडकरींनी म्हटलं, "शंभर-शंभर लोक भेटायला यायचे. पहिल्यांदा छोट्या-छोट्या लोकांची कामे मार्गी लावायचो. नंतर मोठ्या नेत्यांना भेटायचो. कारण, त्यांना अधिक बोलायचे असतं. त्यामुळे थांबावं लागत होतं. माझा उद्देश चुकीचा नव्हता."
पक्षाचे अध्यक्ष असताना नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) गुजरातचे मुख्यमंत्री होते. तरीही, मोदी कधीही तुम्हाला भेटायला आले नाहीत? या प्रश्नावर गडकरींनी म्हटलं, "नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. आम्ही मोदींच्या नेतृत्त्वात काम करत आहे. मोदी देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार यशस्वीरित्या चालण्यासाठी आम्ही योगदान देण्याचं काम करतो आहे."
"मी काही मोठा माणूस नाही. बॅनर्स चिटकवण्यापासून स्लिप वाटण्यापर्यंत मी काम केलं आहे. 45 वर्षांपासून विमानतळावर माझ्या स्वागतासाठी कोणी आलं नाही. तसेच, निवडणूक जिंकल्यानंतर माझा सत्कार केला नाही. कारण, मला ते आवडत नाही," असं गडकरींनी सांगितलं.
"मी जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे चांगली गुण दिसत आहेत, ते संघ आणि विद्यार्थी परिषदेमुळेच," असं गडकरींनी म्हटलं.
बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावरून गडकरींना लक्ष्य करण्यात आलं. याबद्दल विचारल्यावर गडकरी म्हणाले, "तिथे आमचा एकही पूल कोसळला नाही. ज्या झाडाला जास्त फळे लागतात, त्यावर लोक दगड मारतात. मी देश, समाज आणि कुटुंबासाठी काम करतो. कोणाला काय वाटते, याची काळजी करत नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.