Amit Shah Vs Mamata Banerjee Sarkarnama
देश

Amit Shah Vs Mamata Banerjee : 'CAA' वरून अमित शाह यांचं ममता बॅनर्जींना आव्हान, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Kolkata News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील धर्मतला येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र सोडले.

अमित शाह म्हणाले, ''ज्या राज्यात एवढी घुसखोरी होते ते कधी विकास करू शकतं का?, यामुळेच ममता बॅनर्जी CAAचा विरोध करत आहेत. ममता बॅनर्जींना सांगू इच्छितो की, CAA देशाचा कायदा आहे आणि याला कोणी रोखू शकत नाही. आम्ही यास लागू करूनच राहू. तिथून येणाऱ्या हिंदू बंधू-भगिनींचा देशावर तेवढाच अधिकार आहे, जेवढा माझा आणि तुमचा आहे.''

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 2024च्या निवडणुकांमध्ये भाजप सरकार बनवून सत्तेत येईल. मी आज आवाहन करायला आलोय, की जर 2026मध्ये इथे (बंगालमध्ये) भाजपचे सरकार बनवायचे आहे, तर याचा पाया 2024च्या लोकसभा निवडणुकीत रचून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचार यांसारख्या मुद्द्यांवरून जोरदार हल्ला चढवला. त्यांनी जनतेला तृणमूल काँग्रेस सरकार उलथवून पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. 2026 मध्ये भाजप दोन तृतीयांश बहुमताने राज्यात सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.

याशिवाय अमित शाह म्हणाले, ज्या ममता बॅनर्जी अगोदर घुसखोरीच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज चालू देत नव्हत्या, त्याच आता त्यांना मतदान कार्ड बनवून देत आहेत. त्या आता गप्प आहेत. आज बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहाेचला आहे. बॉम्बस्फोट घडत आहेत, नेत्यांच्या घरांमध्ये एवढी नोटांची बंडलं, यापूर्वी कधीच सापडली नव्हती.

बंगालमध्ये हे सर्व दिसून येत आहे. अमित शाह म्हणाले, कधी काळी साहित्य, विज्ञान, कला, उद्योग, अध्यात्म, स्वातंत्र्याच्या आंदोलनात संपूर्ण देशाचे नेतृत्व बंगाल करत होतं. परंतु आता याच पश्चिम बंगालला सर्वात मागास बनवण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलं आहे. त्यांनी बंगालला आज उद्ध्वस्त केलं आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या झालेल्या हत्यांवरूनही शाह यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT