Ajit Doval  
देश

अजित डोवाल यांच्या घरात अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न; घातपाताचा संशय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करत त्यांची सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखत ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. आज (१६ फेब्रुवारी) सकाळी ही घटना उघडकीस घडली.

संबंधित तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून भाड्याने वाहन चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच तो भान हरपल्याप्रमाणे बोलत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्याला अजित डोवाल यांना भेटायचे आहे आणि तेच त्याची समस्या सोडवू शकतात, असे तो वारंवार बोलत होता. यासोबतच आपल्या शरीरात एक चीप टाकण्यात आली असून, आपल्याला रिमोट कंट्रोलने नियंत्रित करण्यात येत असल्याचेही तो सांगत होता.

मात्र वैद्यकीय चाचणीदरम्यान त्याच्या शरीरात कोणतीही चिप किंवा उपकरण आढळून आलेले नाही. ही व्यक्ती कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेसह दहशतवादविरोधी युनिटही संशयित व्यक्तीची चौकशी करत आहे. एनएसएच्या घरात तो चुकून घुसला होता की त्यामागे सुनियोजित कट होता याचा तपास सुरू आहे.

अजित डोवाल हे दिल्लीतील उच्च सुरक्षा भागात राहतात. 5 जनपथ बंगला येथे त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. डोवाल यांच्या आधी देशाचे माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल या बंगल्यात राहत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही त्यांच्या बंगला त्यांच्या निवासस्थानापासून जवळच आहे.

अजित डोवाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासारखी महत्त्वाची पदे आहेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. डोभाल हे सुरुवातीपासूनच दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या कार्यालयातील रेकीचा व्हिडिओ सापडला होता. दहशतवाद्याने हा व्हिडिओ त्याच्या पाकिस्तानी हँडलरला पाठवला होता. यानंतर त्यांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT