Fuel demand surge : इराण युध्दामुळे जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतावर या युध्दाचा काही अंशी परिणाम झाला आहे. प्रामुख्याने मागील महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडर मिळण्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.
आता आंध्र प्रदेशातून इंधन तुटवड्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील ४ हजार ५१० पेट्रोल पंपांपैकी ४२१ पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती मुंबईच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आंध्रातील अधिकाऱ्यांनी दिली. अमरावतीला निघण्यापुर्वी चंद्राबाबूंनी अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तातडीने बैठक घेतली. या बैठकीत ही माहिती समोर आली.
अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या तुटवड्यामुळे राज्यातील ४२१ पेट्रोल पंप बंद पडले आहे. इंधनाचा पुरवठा होत नसल्याने हे पंप बंद करावे लागले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत अत्यावश्यक पावले उचलण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे राज्यातील इंधन पुरवठा मागील काही दिवसांत दहा टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात मागणीतही वाढ झाली आहे. लोकांकडून भीतीपोटी अधिकाधिक इंधन घेतले जात असल्याने विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच पेट्रोल पंपांवरील साठा वेगाने कमी होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
आंध्र प्रदेशात दररोज सुमारे ६ हजार ३३० किलोलिटर पेट्रोल आणि ९ हजार ४८ किलोलिटर डिझेलची विक्री होत असते. परंतु ग्राहकांची मागणी वाढली त्यामध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री तब्बल १० हजार ३४५ किलोलिटर आणि डिझेलची विक्री १४ हजार १५६ किलोलिटरने वाढली आहे. त्यामुळे जवळपास ५० टक्के साठा कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.ही स्थिती शनिवारची होती.
राज्यातील काही जिल्ह्यांतील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. प्रामुख्याने अत्यावश्यक क्षेत्रांना इंधन कमी पडू देऊ नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.