Mekapati Goutham Reddy  Sarkarnama
देश

दुबईहून परतलेल्या मंत्र्याचा 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री दुबईला गेले होते.

सरकारनामा ब्युरो

अमरावती : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्री (Minister) मेकापती गौतम रेड्डी (Mekapati Goutham Reddy) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने आज मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यासह सगळ्या मंत्रिमंडळालाच धक्का बसला आहे.

मंत्री रेड्डी हे राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दुबईला गेले होते. ते कालच (ता.20) दुबईहून हैदराबादला परतले होते. त्यानंतर आज सकाळी घरातच ते कोसळले. त्यांना तातडीने ज्युबिली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री रेड्डी यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तरुणपणापासून सोबत असलेला सहकारी गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळातील तरुण सहकाऱ्याच्या मृत्यूबद्दल बोलताना मला शब्दही सुचत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांना आज सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी ते कोणताही प्रतिसाद नव्हते, त्यांचा श्वासोश्वास सुरू नव्हता आणि त्यांना कार्डियाक अरेस्टही आला होता. त्यांना तातडीने सीपीआर देऊन अॅडव्हान्स्ड कार्डियाक लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. हृदयविकारतज्ञांसह इतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांना 90 मिनिटे सीपीआर देण्यात आला. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यांचा सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT