Parab-Somaiya News Update
Parab-Somaiya News Update  Sarkarnama
देश

ED सोमय्यांच्या सांगण्यावरुन चालते का.. ? ; अनिल परब भडकले...

सरकारनामा ब्युरो

Kirit Somaiya : ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय, शिंदे गटाचे नेते, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी ईडीने (ED)ने आज (शुक्रवारी) ताब्यात घेतले आहे. या कारवाईबाबत अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत ईडी व भाजप नेत्यांवर तोंडसूख घेतलं आहे.

भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कदम यांच्या कारवाईनंतर परबांनी सोमय्यांवर गंभीर टीका केली आहे.

ईडीला संपूर्ण सहकार्य करुनही सदानंद कदम यांना ईडीने समन्स दिले आहे. कदम यांचे ऑपरेशन झाल्याने त्यांना 10 ते 15 दिवस विश्रातींची गरज आहे, याबाबत त्यांनी ईडीला कळवले होते, तरीही त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला आणल्या गेले असा आरोप परब यांनी केला आहे.

"किरीट सोमय्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत, याचा अर्थ किरीट सोमय्यांच्या सांगण्यावर ईडी चालते आहे का ?, आम्ही पहिल्या दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले, त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर दिले. सर्व माहिती देऊनही सदानंद कदम यांना येथे बोलावले आहे. म्हणून केवळ खेडच्या सभेचा हा परिणाम आहे का," असा सवाल परब यांनी उपस्थित केला आहे.

साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असं अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे याप्रकरणात आता सदानंद कदम यांची चौकशी सुरू झाल्याने अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.

"सदानंद कदम यांच्या हाताची काल शस्त्रक्रिया झाली आहे. कालच त्यांना ईडीकडून समन्स दिले. त्यांनी विश्रांतीचह गरज असल्याचे ईडीला कळवले होते तरीही त्यांना ताब्यात घेण्यात आले असून मुंबईत आणले जात आहे," अशी खंत परब यांनी व्यक्त केली आहे.

"किरीट सोमय्या यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी म्हाडा प्रकरणी देखील माझ्यावर आरोप केले होते. मात्र म्हाडाने त्याबाबत स्पष्टता देत माझा काही संबंध नाही असे सांगितले होते. किरीट सोमय्या यांच्यावर मी मानहानीचा गु्न्हा दाखल केला, आणि या प्रकरणातही मी निकाल लागताच किरीट सोमय्यांना उत्तर देईल," असे परब यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT