Jaggi Brothers Sarkarnama
देश

Modi Government : देशात पुन्हा मोठा कर्ज घोटाळा; जग्गी बंधूंचा हात, मोदी सरकारकडून चौकशी सुरू

Who Are Anmol Singh Jaggi and Puneet Singh Jaggi : अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या बंधूंनी कर्जाच्या पैशांचा वापर आपल्या उच्चभ्रू लाईफस्टाईलसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Rajanand More

New Delhi News : मागील काही वर्षांत काही उद्योगपतींनी बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेत फसवणूक केल्याची प्रकरणं अजूनही देशात गाजत आहेत. काही उद्योगपती देश सोडून पळून गेले आहेत, तर काहींचा मुसक्या तपास यंत्रणांनी आवळल्या आहेत. पण आता पुन्हा एकदा देशात जवळपास एक हजार कोटींचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. मोदी सरकारकडून या घोटाळ्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

जेन्सोल इंजिनिअरिंग या कंपनीचे नाव घोटाळ्यात समोर आले आहे. कपनीचे मालक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या बंधूंनी कर्जाच्या पैशांचा वापर आपल्या उच्चभ्रू लाईफस्टाईलसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेबीच्या तपासात हा घोळ समोर आल्यानंतर आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या कथित घोटाळ्याची चोकशी सुरू केल्याचे समजते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा घोटाळा 975 कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जेन्सोल इंजिनिअरिंगवर या प्रकरणी कारवाई केली आहे. सेबीने कंपनीच्या मालकांना कंपनीत संचालक होण्यापासून आणि शेअर बाजारात व्यवहार करण्यापासून बंदी घातली आहे. तसेच अंतर्गत चौकशीही सुरू केली आहे.

जग्गी बंधूंचा कारनामा समोर आल्याने गुंतवणूकदार मात्र हवालदिल झाले आहे. सेबीच्या तपासात समोर आले आहे की, जग्गी बंधूंनी कर्जाच्या पैशातून गुरुग्राममध्ये एक महागडे घर खरेदी केली आहे. त्यासाठी कर्जाच्या पैशांचा वापर केला. हे पैसे कोणत्या खात्यातून कसे वळवले, याची संपूर्ण साखळी सेबीच्या हाती लागली आहे.

जेन्सोल कंपनीने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी IREDA आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून तब्बल 975 कोटींचे कर्ज घेतले होते, असे समोर आले आहे. मात्र प्रत्यक्षात मोजक्याच पैशांचा वाहने खरेदीसाठी वापर केल्याचे समजते. कर्जाचे हप्ते टाळण्यासाठी बनवाट कागदपत्रे बनविल्याचेही समोर आले आहे. सेबीने तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे.

जेन्सोल इंडिनिअरिंग ही रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत कंपनी असून प्रामुख्याने सौर ऊर्जेशी संबंधित उत्पादने आणि कामांमध्ये सक्रीय आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही प्रवेश केला होता. आर्थिक वर्षे 2017 मध्ये कंपनीचा महसूल केवळ 61 कोटी होता. तो 2024 पर्यंत तब्बल 1152 कोटींवर पोहचला होता. तर निव्वळ नफा 2 कोटींवरून 80 कोटींवर गेला होता. पण आता ही कंपनी मोदी सरकारच्या रडारवर आली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT