Supreme Court Sarkarnama
देश

Supreme Court: पक्षांतरबंदी कायदा आणखी कठोर होणार..? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, निवडणूक आयोग अन् विधी आयोगाला नोटीस

Anti Defection Law: भारतीय राज्यघटनेतील 10 व्या परिशिष्टाद्वारे पक्षांतरबंदी कायदा लागू केलेला आहे. संसद, राज्यसभा खासदार आणि विधिमंडळ, विधान परिषद आमदारांचे राजकीय पक्षांतर रोखण्यासाठी 1985 च्या 52 व्या घटनादुरुस्तीने या कायद्याचा समावेश करण्यात आला आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: महाराष्ट्रात संपूर्ण देशभरासह गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस,काँग्रेस,यांसह विविध प्रमुख पक्षांमध्ये बंड पाहायला मिळाले. यात थेट पक्षात उभी फूट पाडत आमदार-खासदारांच्या पक्षांतर किंवा राजीनामे यांसह थेट पक्षावरच दावा सांगितल्याचंही समोर आलं आहे. तर दुसरीकडे न्यायालयात तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दाही तापला आहे. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा आणखी कठोर करण्याबाबतची मागणीही केली जात आहे. याचदरम्यान,अशातच मोठी अपडेट समोर येत आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार किंवा खासदाराने पक्षांतराच्या आरोपांनंतर राजीनामा दिला,तर त्याच्याविरोधातील अपात्रतेची प्रक्रिया थांबवता येऊ नये, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ए.सेथू यांच्यावतीनं ही याचिता दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची गंभीर दखलही न्यायालयानं घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला न्यायालयानं नोटीस बजावली आहे.

ए.सेथू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत आताच्या काळात पक्षांतरबंदी कायद्यामध्ये काही महत्त्वपूर्ण आणि विशाल दृष्टिकोन ग्राह्य धरत दुरुस्तीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या जनहित याचिकेवर याचिकाकर्त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (ता.23) सुनावणी पार पडली.

ए.सेथू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेद्वारे देशात सध्या अस्तित्वात असलेल्या पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशासह लोकप्रतिनिधींच्या अपात्रता प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कठोर व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेतील 10 व्या परिशिष्टाद्वारे पक्षांतरबंदी कायदा लागू केलेला आहे. संसद, राज्यसभा खासदार आणि विधिमंडळ, विधान परिषद आमदारांचे राजकीय पक्षांतर रोखण्यासाठी 1985 च्या 52 व्या घटनादुरुस्तीने या कायद्याचा समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदाच्या लालसेपोटी होणारी पळवापळवी थांबवून सरकारमध्ये स्थिरता राखणे हा पक्षांतरबंदी कायद्याचा मुख्य उद्देश आहे. पण त्यातील तरतुदींचा अनेकदा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT