Gujarat News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली होती. ही टीका आता त्यांना भोवणार असल्याचे दिसते. एका मानहानीच्या फौजदारी खटल्यामध्ये कोर्टाने पाठवलेले समन्स रद्द करण्याची याचिका केजरीवालांनी गुजरात हायकोर्टात केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. (Arvind Kejriwal News)
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांच्यावर गुजरात विद्यापीठाने (Gujarat University) मानहानीचा खटला दाखल केला आहे. स्थानिक न्यायालयाने याबाबत केजरीवाल आणि संजय सिंग यांना समन्स पाठवले आहे. त्याला दोघांनीही सेशन कोर्टात आव्हान दिले होते. तिथेही याचिका फेटाळण्यात आली होती.
आता हायकोर्टानंही (High Court) याचिका फेटाळत केजरीवालांना धक्का दिला आहे. न्यायमूर्ती हसमुख सुधार यांनी केजरीवाल आणि संजय सिंह यांची याचिका फेटाळताना ट्रायल कोर्टात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. कोर्टाने केजरीवालांना मागील वर्षी 15 एप्रिला समन्स बजावले आहे. दोघांनीही सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान दिले होते, पण कोर्टाने याचिकेची दखल घेतली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यामध्ये केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना पाचवे समन्सही पाठवण्यात आले आहे. 19 तारखेला त्यांना चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे, पण केजरीवालांनी यापूर्वीच्या चार समन्सला दाद न दिल्याने ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने केजरीवालांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता केजरीवाल काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.