Arvind Kejriwal Latest News  Sarkarnama
देश

पैसे भाजपचे घ्या, काम मात्र 'आप'चे करा; केजरीवालांचे आवाहन

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आमदमी पक्षाने (AAP) कंबर कसली आहे

सरकारनामा ब्यूरो

Arvind Kejriwal : राजकोट : गुजरातमध्ये (Gujarat) वर्षअखेरीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी आपने कंबर कसली आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात 'आप' (AAP) ने प्रचाराला वेग दिल्यानंतर या दोन्ही राजकीय पक्षातील संघर्षही तीव्र झाला आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना 'आप'साठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

केजरीवाल म्हणाले, भाजपमध्ये राहा मात्र, काम 'आप'साठी करा. केजरीवाल यांनी आज राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. आम्हाला भाजपचे नेते नकोत. त्यांनी ते त्यांच्याच जवळ ठेवावेत. आम्हा भाजपचे जेवढे पन्नाप्रमुख आहेत, कार्यकर्ते आहे, गावागावांमधील, तालुक्यांमधील आणि मतदान केंद्रांवरील भाजप समर्थक आमच्याशी जोडले जात आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

यामध्ये अनेक लोक फार चांगले आहे. त्या लोकांना मी आवाहन करतो. तुम्ही एवढ्या वर्ष भाजपची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले? तुमच्या मुलांना शाळा दिल्या का? रुग्णालये बांधली का? उपाचारांसाठी जमीन किंवा दागिने गहाण टाकावे लागतात की नाही? तुम्हालाही विजेची मोठी बिले द्यावी लागतात की नाही; असे सवाल केजरीवाल यांनी मतदारांना विचारले आहेत.

आमच्याकडे देण्यासाठी पैसे नाही. तर पैसे तुम्ही भाजपकडून घ्या काम मात्र, आमच्यासाठी करा असे केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 'मी तुम्हाला साऱ्याचे आश्वासन देतो. भाजप सोडायची गरज नाही. तुम्ही भाजपमध्ये राहा आणि काम आमच्यासाठी म्हणजे 'आप'साठी करा. अनेक कार्यकर्त्यांना ते पैसे देतात. पैसे त्यांच्याकडूनच घ्या, आमच्याकडे पैसे नाही. आमचे सरकार आले, आम्ही मोफत वीज देऊ तेव्हा तुम्हालाही मोफत वीज मिळेल. मी २४ तास मोफत वीज देईल. तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभ्या करीन. मोफत शिक्षण देईन. तुमच्या कुटुंबावर मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा देईन. तुमच्या घरातील महिलांना एक एक हजार रुपये देईन, असेही केजरीवाल यांनी म्हटले. आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT