Arvind Kejriwal Wife Sunita kejariwal in Trouble Sarkarnama
देश

Arvind Kejriwal Wife Case : केजरीवाल यांच्या पत्नी अडचणीत; दोषी आढळल्यास होऊ शकते दोन वर्षांची शिक्षा...

Chetan Zadpe

Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला समन्स बजावले आहे. दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये आपले नाव नोंदवून लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांचा जवाब मागितला आहे. (Latest Marathi News)

दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी अरजिंदर कौर यांनी हे समन्स बजावले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हरीश खुराणा यांनी सुनीता केजरीवाल यांच्या विरोधात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. यानंतर आता न्यायालयाने केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने म्हंटले आहे की, "याचिकाकर्ते आणि इतर साक्षीदारांचे पुरावे विचारात घेतल्यानंतर, सुनीता केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला सुरू करण्याचा न्यायालयाचा निर्णय आहे."

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. खुराणा यांनी 2019 मध्ये सुनीता केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. खुराणा म्हणाले, "लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमाचे उल्लंघन करून दिल्लीच्या साहिबाबाद (गाझियाबाद मतदारसंघ) आणि चांदनी चौक अशा दोन्ही मतदारसंघातच्या मतदारयादीत सुनीता केजरीवालांची मतदार म्हणून नोंद आहे. केजरीवाल यांना या गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊ शकते."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT