Aryan Khan Sarkarnama
देश

आर्यन खान ड्रग्जचे नियमित सेवन करायचा : एनसीबीचा कोर्टात दावा

आर्यन खानच्या (Aryan Khan) वतीने अॅड. अमित देसाई (Amit Desai) आणि अॅड. सतीश मानेशिंदे (Satish Mans-shinde) तर एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह (Anil singh) यांनी युक्तिवाद केला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्स (Drugs party) पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा (Aryan Khan) तुरुंगातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयात गुरुवारी झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीनंतर विषेश न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी २० ऑक्टोबरपर्यंत हा निकाल राखून ठेवला आहे. एनसीबीने आर्यनला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते आणि चौकशीनंतर अटक केली होती. तो सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.

आर्यन खानच्या (Aryan Khan) वतीने अॅड. अमित देसाई (Amit Desai) आणि अॅड. सतीश मानेशिंदे (Satish Mans-shinde) तर एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह (Anil singh) यांनी युक्तिवाद केला. अनिल सिंह म्हणाले, प्राथमिक तपासात आरोपींचे आंतरराष्ट्रीय लिंक्स समोर आल्या आहेत. त्या सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आपण त्यांना स्वतंत्रपणे पाहू शकत नाही. आमच्याकडे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि इतर पुरावे आहेत.

एनसीबीचे गंभीर आरोप

अनिल सिंह यांनी कोर्टात दावा केला की, आर्यन खान मागच्या अनेक वर्षांपासून ड्रग्सचे नियमित सेवन करायचा. कोर्टापुढे ठेवलेले रेकॉर्ड आणि पुरावे दर्शवतात की तो मागच्या अनेक वर्षांपासून बंदी असलेल्या पदार्थांचा नियमित सेवन करायचा. आर्यनसोबत आलेल्या अरबाज मर्चंटच्या ताब्यातून देखील बंदी असलेले साहित्य सापडले आहे. पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की आर्यन हा बंदी घातलेले पदार्थ वापरणार होता. आर्यनने कबूल केले होते की, बंदी असलेले पदार्थ दोघांसाठी त्याच्या मित्राकडे होते. आर्यन ड्रग पेडलरच्या संपर्कात होता.

आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस अॅक्ट 29 नुसार अशा कटात सामील असणे हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही तरी जेव्हा एनडीपीएस अॅक्ट 29 लावले जाते तेव्हा आरोपी मुख्य सूत्रधाराइतकाच दोषी असतो असाही अनिल सिंह यांनी कोर्टात दावा केला.

दुसऱ्या देशांमध्ये ड्रग्ज घेतले

एनसीबीच्या दाव्यानुसार आर्यनने फक्त भारतातच नाही तर इंग्लंड, दुबई अशा बाहेरच्या देशांमध्ये देखील ड्रग्जचे सेवन केले आहे. तो नियमित आपला मित्र अरबाजसोबत ड्रग्स घेत आहे. ते दोघे मागच्या १५ वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, असेही अनिलसिंग यांनी सांगितले.

आर्यन खानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला की, केवळ षडयंत्राची शक्यता असल्याचे सांगत त्याच्या जामीनाला विरोध करता येणार नाही. आर्यनच्या फोनमध्ये कोणत्याही रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही. सोबत आर्यन अनेक वर्षे परदेशात होता. मात्र तिथे अनेक गोष्टी कायदेशीर होत्या. त्यामुळे ते तिघे दुसरे काहीतरी बोलत असण्याची शक्यता असू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT