BJP and Congress
BJP and Congress  Sarkarnama
देश

जोधपूरमध्ये दंगल पेटताच भाजपचे काँग्रेसवर वार : हा तर लांगूलचालनाचा परिणाम

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - देशभरात ईद व अक्षयतृतीया हे सण साजरे केले जात असतानाच राजस्थानातील जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी दंगल झाली. त्यावरून भाजप ( BJP ) व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू झाल्या आहेत. जोधपूरमध्ये होत आहे ते सुनियोजित कारस्थान असून काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या धोरणाचा हा आणखी एक स्फोट झाल्याची टीका भाजपने केली आहे. ( As soon as riots broke out in Jodhpur, BJP attacked Congress: this is the result of tailgating )

भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी व शहानवाज हुसेन यांच्याकडे आज ईदनिमित्त स्नेहमेळावे झाले. त्याला जोडूनच दोन्ही नेत्यांनी जोधपूरच्या दंगलीवर भाष्य केले. हुसेन यांनी सांगितले की भाजपच्या राज्यांत गरीबकल्याणाच्या योजनांबाबत भेदभाव केला जात नाही. तेथे ‘सबका साथ सबका विकास' हे धोरण प्रत्यक्षात येत आहे तर काँग्रेसच्या राज्यांत दंगली घडत आहेत. जनता हे सारे पहात आहे.

केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की जोधपूरच्या घटनेत काँग्रेसने भाजपला जबाबदार धरणे हास्यास्पद आहे. एक सुनियोजित कट कारस्थान म्हणून या घटनेकडे पहावे लागेल व त्याचा तपासही केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत झाला पाहिजे. हे एक ‘सणकी‘ ककारस्थआन आहे. राजस्थानातील सरकारची धर्मनिरपेक्षता म्हणे व्होट बॅंकेचा भाग आहे. पण आता राजस्थान सरकार आपल्याच जाळ्यात अडकल्याचे जोधपूरच्या घटनेने सिध्द केले. भाजप शासित राज्यांत शांतता आहे तर काँग्रेस शासित राज्यांत दंगली होत आहेत याचे कारण उघड असून काँग्रेसच्या इतिहासात ते दडलेले आहे असा हल्लाबोल शाहनवाज हुसेन यांनी केला.

दरम्यान माजी केंद्रीय मंत्री व जोधपूरचे खासदार राज्यवर्धन राठोड यांनी या दंगलीबाबत काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. ते म्हणाले की राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागताच राजस्थानातील गेहलोत सरकार कायदा सुव्यवस्था परिस्थिती सांभाळू शकत नाही व नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या धोरणामुळे राज्यात एका समाजाचे धाडस फार वाढले असून ते ता सणासुदीलाही उपद्रव करत आहेत. गेहलोत सरकारने विविध समाजांसाठी विविध नियम बनविले आहेत. एका समाजाला कायदा हातात घेतला तरी सरकारचेच अभय मिळत आहे. राजस्थान सरकार एकीकडे रामनवमी मिरवणुकांना आडकाठी करते, मंदिरे पाडली जातात व दुसरीकडे रमजानमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये असे देश देते याचा अर्थ स्पष्ट आहे असाही आरोप राठोड यांनी केला.

दिल्लीचा मोह आणि..... !

भाजप नेतृत्वाने शाहनवाज हुसेन यांची ‘बदली‘ बिहारमध्ये केली असली तरी त्यांची दिल्लीला परतण्याची तीव्र इच्छाही यानिमित्ताने पुन्हा ओठावर आली. शाहनवाज हुसेन आज सकाळी ईदची नमाज करण्यासही संसदेच्या समोरील एतिहासिक मशिदीत गेले होते. त्याचबरोबर या मशिदीत माजी राज्यसभाध्यक्ष मोहम्मद हामीद अंसारी व माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणावर हजेरी येथे अनेक वर्षांनी पहायला मिळाली. नवीन संसद व सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या कामामुळे या मशिदीकडील रस्ते सध्या बंद करण्यात आले आहेत. याच्या आसपासच्या रेडक्रॉस मुख्यालय, श्रम शक्ती भवन, परिवहन भवन या इमारती पाडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT