AIMIM President Asaduddin Owaisi
AIMIM President Asaduddin Owaisi Sarkarnama
देश

Asaduddin Owaisi : असुद्दीन ओवेसी यांचे लोकसभा सदस्यत्व होऊ शकते? काय आहे कारण?

Roshan More

Asaduddin Owaisi Disqualification From Parliament News: लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्या एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी 'जय भीम' 'जय तेलंगणा' 'जय पॅलेस्टाईन' घोषणा दिल्या होत्या. त्यांच्या जय पॅलेस्टाईन घोषणेमुळे त्यांचे सभासदस्यत्व रद्द होऊ शकते.

त्यांच्या या घोषणे विरोधात दिल्लीतील वकीलाने राष्ट्रपतींना पत्र लिहून ओवीसी यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. भाजप सदस्यांनी देखील ओवेसी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. लोकसभा सदस्याला अपात्र ठरण्यासाठी संविधानातील कलम 102 मध्ये तरतूद आहे. दरम्यान, लोकसभेच्या रेकाॅर्डवरून ओवेसी यांची घोषणा हटवण्यात आली आहे.

नियम तपासणार

ओवेसी Asaduddin Owaisi यांची घोषणा लोकसभेच्या रेकाॅर्डवरून हटवली असली तरी त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप सदस्यांनी केली आहे. सदस्यत्वाची शपथ घेताना दुसऱ्या देशाचे कौतुक करणारी घोषणा देणे योग्य आहे का? या विषयीच्या नियमांची पडताळणी आम्ही करू. त्यानंतर पुढील कारवाई करू, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.

घोषणेवर औवेसी काय म्हणाले?

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'प्रत्येकजण खूप काही बोलत आहे. मी फक्त जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन म्हणालो. हे कसे विरोधात आहे? संविधानातील तरतूद दाखवा. गांधीजी Mahatma Gandhi पॅलेस्टाईन विषयी काय बोलले आहेत ते वाचा.

सदस्यत्वाला अपात्र ठरवण्यासाठी काय तरतूद?

- कलम 102 नुसार लोकसभा, राज्यसभ सदस्यत्व रद्द केले जावू शकते.

- संसदेत सांगितलेल्या पदाशिवाय सदस्याने राज्य सरकार, केंद्र सरकारमध्ये कोणते लाभाचे पद स्वीकारले असेल

- सदस्याची मानसिक स्थिती ठीक नसेल

- दुसऱ्या देशावर निष्ठा दाखवली

- तसेच 10 अनुसूचीनुसार सदस्याने आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT