Naba Das, Gopal Das
Naba Das, Gopal Das  sarkarnama
देश

Naba Das : आरोग्यमंत्र्यांवर त्याने का झाडल्या गोळ्या ? ; हत्येपूर्वी मुलीला केला होता Video Call..

सरकारनामा ब्युरो

Odisha Health Minister Gopal Das News : ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास (Naba Das)यांचा रविवारी एका हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर गावात दुपारी १ वाजता घडली.

पक्षाच्या एका कार्यक्रमाला जात असलेले नबा दास (वय ६०) लोकांच्या अभिवादनासाठी कारमधून उतरत असतानाच एक सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) गोपाल दासने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. यानंतर ते वाहनाच्या सीटवर पडले. मंत्र्यांना एअरलिफ्ट करून भुवनेश्वर येथील रुग्णालयात हलवले. तिथे रात्री सुमारे ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दास याला पोलिसांनी अटक केली आहे, या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. नबा किशोर दास यांची गोपाल दासने का हत्या केली, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

नबा दास यांची हत्या गोपाल दास यांने का केली याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसले तरी, याबाबत अनेक आश्चर्यकारण माहिती समोर येत आहे.

आरोपी गोपाल दास हा आठ वर्षापासून बाझपोलर डिसआँर्डर (Bipolar Disorder) या आजाराने ग्रस्त होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण गेल्या वर्षभरापासून त्याने उपचार थांबवले होते. पाच महिन्यापासून तो आपल्या कुटुंबियांना भेटला नव्हता, काल त्याने आपल्या मुलीशी व्हिडिओ कॉलवरुन संभाषण केले होते, असे त्याच्या पतीने पोलिसांना सांगितले आहे.

नाबा दास हे काल (रविवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारात ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला होता. ते कारमधून उतरत असताना त्यांच्या सुरक्षासाठी तैनात असलेल्या ASI गोपाळ दास याने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. उपचारा दरम्यान नाबा दास यांचा मृत्यू झाला .

नाबा दास यांच्या मृत्यूनंतर तीन दिवस ओडिशामधील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पटनायक सरकारने जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन दास यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले आहे.

नाबा दास हे ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत. 2015 साली विधानसभेच्या अधिवेशनात नब किशोर दास सभागृहातच अश्लिल व्हिडिओ पाहताना दिसून आले होते. त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते.

2004 मध्ये नाबा दास यांनी ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

त्यांनी 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT