Assam-Meghalaya Clash News update Sarkarnama
देश

Assam-Meghalaya Clash : कर्नाटक-महाराष्ट्रानंतर आता 'या' दोन राज्यात सीमावाद पेटला ; एका गावामुळे..

Assam and Meghalaya CM Claim Mukroh: हे गाव कुणाचे यावरुन गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात सहा जणांना मृत्यू झाला होता.

सरकारनामा ब्युरो

Assam-Meghalaya Border Dispute : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद ताजा असतानाच आता मेघालय-आसामचा सीमावाद उफाळून आला आहे. यावरुन दोन्ही राज्यातील राजकारण तापलं आहे. मेघालय-आसामच्या सीमारेषेवर असलेल्या एका गावावरुन हा वाद पेटला आहे.

मुकरोह या गावावरुन हा वाद पेटला आहे, हे गाव आपले असल्याचा दावा आसामने केला आहे, तर मेघालयाने हा दावा फेटाळला आहे. हे गाव कुणाचे यावरुन गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात सहा जणांना मृत्यू झाला होता.

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा म्हणाले, "मुकरोह गावाचे रहिवासी मेघालय सरकारच्या विविध योजनाचा लाभ घेत आहेत," गेल्या आठवड्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्मा शर्मा यांनी विधासभेत मुकराह गाव हे आसामचे असल्याचे विधानसभेत सांगितले.

मुकरोह हे मेघालयाचे आहे, याबाबत पुरावे असल्याचे मुख्यमंत्री संगमा यांनी स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुकरोह येथेही मतदान झाले होते. या गावात दोन मतदान केंद्र असून हा परिसर मोकाइन मतदार संघात येतो.

गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी बेकायदा लाकडाचा एक ट्रक पोलिसांनी पकडला होता. यावर दोन्ही राज्यातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यामध्ये राडा झाला होता. यात मुकरोह येथील पाच तर आसाममधील एका वनरक्षकांचा मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT