D. k. Shivkumar Sarkarnama
देश

Assembly Election Result : निकालापूर्वीच भाजपच्या फोडाफोडीचा धसका : आमदारांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचा 'संकटमोचक' नेता आसाममध्ये

dk shivakumar bhupesh baghel guwahati visit over assam congress mlas protection : आसाम विधानसभा निवडणुकीत १२६ जगांसाठी मतदान गेल्या महिन्यात झाले असून आता येथील राजकीय वातावरण तापत चालले आहे.

Aslam Shanedivan

  1. आसाम विधानसभा निकालांपूर्वी काँग्रेसने आमदारांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली.

  2. डीके शिवकुमार आणि भूपेश बघेल गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

  3. दलबदल रोखणे आणि पक्ष एकजूट राखणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Assam Election Result : गेल्या महिन्यातील 9 तारखेला आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यावेळी येथे एकाच टप्प्यात मतदान पार पडले असून रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आहे. त्यामुळे आसाममध्ये एनडीएची अग्निपरीक्षा असणार असून काँग्रेला आता फुटीची भीती वाटत आहे. तर या फुटीपासून वाचण्यासाठी काँग्रेसकडून हॉटेल पॉलिटीक्स खेळली जात आहे. यासाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तातडीने आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील आसाममध्ये दाखल झाले.

आसाम विधानसभेच्या नुकताच निवडणुका पार पडल्या. यावेळी १२६ जगांसाठी मतदान झाले, ज्यामध्ये तब्बल ७२२ उमेदवार रिंगणात होते. २०२१ मध्ये आसाममध्ये ८२.०२ टक्के मतदान झालं होतं. पण यंदा नव्यानं झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना आणि एसआयआर प्रक्रियेनंतर येथे रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले. यंदा आसाममध्ये ८५.३८ टक्के मतदान झाले असून मागच्या वेळी पेक्षा ३ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरदार चर्चा आता देशात सुरू आहे. तर सहा पक्षांशी युती काँग्रेसने येथे केली आहे.

उद्याच्या ४ मे रोजी निकाल लागणार असून आपल्या आमदारांची फोडाफोडी होऊ शकते अशी भीती काँग्रेसला आहे. तर शिवकुमार यांनी देखील आपण पक्ष बलच्या पार्श्वभूमीवर आसामचा दौरा करत असल्याचे शनिवारी (ता. २) म्हटले आहे. त्यांनी, "मी आमच्या आमदारांसह पक्षाचे संरक्षण, मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी येथे आहे. आज आणि उद्या आमचे आमदार सुरक्षित आहेत."

हॉटेल पॉलिटीक्ससाठी प्रसिद्ध असणारे शिवकुमार यांनी आसाममध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचा अंदाज आणि एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी असा आरोप केला की, एक्झिट पोल अनेकदा मतदार संघातील संख्येवर नाही तर अतिशय कमी लोकांच्या म्हणण्यावर असतो. आणि त्या आधारे असे निकाल सादर केले जातात. तर माजी मुख्यमंत्री बघेल यांनी देखील यावर टीका केली आहे. त्यांनी, एक्झिट पोलला "कॉपी-पेस्ट" प्रकार म्हणत ते क्वचितच अचूक ठरत असल्याचा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले शिवकुमार?

"एक्झिट पोल आमच्या बाजूने असोत वा नसोत, मी त्यावर विश्वास ठेवत नाही. एक्झिट पोलचा अंदाज हा लहान नमुन्यावर आधारीत असतो, त्यामुळे मी माझी स्वतःची आकडेमोड करतो.". पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांबद्दल विचारले असता, शिवकुमार म्हणाले, "इंडिया आघाडी प्रत्येक राज्यात सरकार स्थापन करेल. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना याचा पूर्ण विश्वास आहे की काँग्रेस आघाडी सत्तेत येईल. माझा माझ्या नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे. तसाच माझा विश्वास आसामच्या मतदारांवर देखील आहे. त्यांना आता बदल हवा असून तो त्यांना मिळेल.

एक्झिट पोलचा अंदाज?

एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला १२६ पैकी ८८-१०० जागा मिळतील. तर काँग्रेसच्या आघाडी २४ ते ३६ जागा. जेव्हीसीने आपल्या अंदाजात एनडीएसाठी ८८-१०१ जागा आणि काँग्रेससाठी २३-३३ जागा मिळतील असा अंदाज सांगितला आहे. तर एआययूडीएफ ने तर फक्त २ जागा काँग्रेसला मिळतील असे सांगितले असून इतरांनाही तीन जागा दिल्या आहेत. मॅट्रिजने हा आकडा एनडीएसाठी ८५ ते९५ असा दाखवला असून काँग्रेसला २५ ते ३२ जागा येतील असे म्हटले आहे. तर इतरांना ६ ते १२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

FAQs :

1. डीके शिवकुमार गुवाहाटीत का गेले आहेत
काँग्रेस आमदारांचे संरक्षण आणि दलबदल रोखण्यासाठी ते गुवाहाटीत गेले आहेत

2. त्यांच्या सोबत कोण आहेत
त्यांच्यासोबत भूपेश बघेल देखील उपस्थित आहेत

3. हा निर्णय कशामुळे घेतला गेला
आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी राजकीय हालचाली वाढल्यामुळे हा निर्णय घेतला गेला

4. काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट काय आहे
पक्ष एकजूट राखणे आणि आमदारांचे संरक्षण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे

5. याचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो
यामुळे दलबदल रोखला जाऊ शकतो आणि काँग्रेसची स्थिती मजबूत राहू शकते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT