Amit Shah
Amit Shah Sarkarnama
देश

अमित शहांनी दोन मुख्यमंत्र्यांना समोर बसवलं अन् पन्नास वर्षांपासूनचा वाद मिटला

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मध्यस्थीमुळे आसाम (Assam) आणि मेघालयमध्ये (Meghalaya) 50 वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावाद मिटला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिल्लीत शहांच्या उपस्थितीत ऐतिहासिक कराराव स्वाक्षरी केली. या दोन राज्यांमध्ये 885 किलोमीटरची सीमा असून त्यावरून सातत्याने राज्यांमध्ये तणावाची स्थिती उद्भवली आहे.

दोन्ही राज्यांमधील सीमावाद खूप जूना आहे. त्याची सुरूवात 1927 मध्ये झाली होती. आसामपासून मेघालय वेगळं केलं आणि नव्या राज्याच्या सीमांकनावरून वाद सुरू झाला. दोन्ही राज्यांमध्ये असलेल्या 885 किलोमीटरची सीमा असून सध्या सीमेवरील 12 ठिकाणांबाबत वाद आहे. आसाम पुनर्गठन अधिनियम 1971 अंतर्गत मेघालयाला स्वतंत्र करण्यात आलं. याच कायद्याला मेघालयने आव्हान दिलं. कोणता भाग कोणत्या राज्यांत यावरून दोन्हीकडील नागरिक अनेकदा भिडले आहेत. त्यातून अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतरही हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. सध्या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्याला गती मिळत गेली. मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आणि मेघालचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा (Conard Sangma) यांनी शहा यांची भेट घेत चर्चा केली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर एक करार करण्यात आला. त्यावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे.

दोन्ही राज्यांतील 70 टक्के सीमावाद आता संपला आहे, असं अमित शहा यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. तर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उर्वरित वादही चर्चेतून सोडवले जातील, असं सांगितलं. कोनार्ड यांनी सांगितले की, 12 विवादित ठिकाणांपैकी सहा ठिकाणांबाबत समझोता झाला आहे. याशिवाय दोन्ही राज्यांच्या भागिदारीतून सर्व्हे ऑफ इंडिया एक सर्वेक्षण करेल. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर वास्तविक सीमांकन होईल. एकूण 36 किलोमीटर अंतराच्या सीमेबाबत दोन्ही राज्यांमध्ये मतभेद असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

शहा यांनी सांगितले की, 16 जानेवारी रोजी ब्रू रियांग करार झाला. त्यामुळे 34 हजार नागिरकांना फायदा झाला आहे. 27 जानेवारी 2020 रोजीही बोडो करार झाला. आम्ही आसामच्या भूमीला कुठेही धक्का न लावता राज्याचे मूळ स्वरूप तसंच ठेवून 50 वर्षांपूर्वीचा वाद संपवला आहे. त्याबाबत आज करार झाला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतात प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता ही राज्य विकासाच्या मार्गाने पुढे जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT