Asam News: देशातील आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आसामध्ये येत्या 9 एप्रिलला मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे. एकीकडे प्रचाराची धामधूम सुरू झाल्यानंतर आता आसाममधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
आसाम निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रुपेश ठाकूर यांचं बुधवारी(ता.25) हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गुवाहाटी येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते आसाम विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच छत्तीसगडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रुपेश ठाकूर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
काँग्रेस नेते रुपेश ठाकूर यांच्या मृत्यूमुळे बलौदाबाजार जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा स्थानिक अन् राज्याच्या राजकारणात वर्चस्व राहिलं होतं. रुपेश ठाकूर यांचं पार्थिव गुवाहाटीहून बलौदाबाजार येथे नेण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रुपेश ठाकूर यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी रुपेश ठाकूर एक समर्पित आणि मेहनती काँग्रेस कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी पक्षाच्या विचारधारेप्रती पूर्ण निष्ठेने काम केलं. त्यांच्या अकाली निधनानं पक्षाचं मोठं नुकसान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.