Assam Violence  Sarkarnama
देश

आसाम हिंसाचारात दोघांचा मृत्यू; नऊ पोलिस जखमी

आसाम सरकारने (Assam Government) दरांग जिल्ह्यात ढोलपूर गोरुखुटी गावात अतिक्रमण विरोधी मोहिम सुरु केली आहे.

सरकारनामा ब्युरो

गुवाहाटी : आसाममध्ये (Assam) दरांग जिल्ह्यात (Darang District) अतिक्रमणे हटविताना पोलिस आणि स्थानिक नागरिक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात (Violent conflict) दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आसाम सरकारने घटनेच्या न्यायालयीन तपासाचे आदेश दिले आहेत.

आसाम सरकारने (Assam Government) दरांग जिल्ह्यात ढोलपूर गोरुखुटी गावात अतिक्रमण विरोधी मोहिम सुरु केली आहे. सरकारने आतापर्यंत सुमारे आठशे कुटुंबांना हलविले आहे. सरकारला ही जागा एका कृषी प्रकल्पासाठी हवी असून हे सर्व लोक अतिक्रमण करून रहात होते, असा आसाम सरकारचा दावा आहे. या भागात स्थलांतरीत मुस्लिमांची वस्ती अधिक प्रमाणात होती, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. आज अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरु असताना जमावाने हल्ला केल्याने शस्त्रबळाचा वापर करावा लागला, असा दावा पोलिसांनी केला आहे.

आंदोलकांच्या दिशेने पोलिस गोळीबार करत असल्याचे चित्रीकरण अनेक वाहिन्यांवर दिसत होते. घटनास्थळी असलेला एक छायाचित्रकारही पोलिसांच्या मारहाणीनंतर निश्‍चेष्ट पडलेल्या एका आंदोलकाला मारहाण करत असल्याचे दृश्‍यही कॅमेरामध्ये बंदिस्त झाले. या प्रकारावर टीका झाल्यानंतर सरकारने घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे पोलिस अधिक्षक सुशांत बिस्व सरमा यांनी सांगितले.

दरम्यान या हिंसाचाराच्या घटनेवर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ''आसाममध्ये राज्यपुरस्कृत संघर्ष सुरु आहे. मी राज्यातील जनतेच्या बाजूने उभा आहे.'' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT