भारतीय जनता पार्टीने पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पंजाबच्या जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने शीलत अंगुराल यांना उमेदवारी दिली आहे.
पश्चिम बंगलाच्या रायगंज मतदार संघात मानस कुमार घोष, राणाघाट दक्षिण जागेवर मनोज कुमार बिस्वास, बगदा जागेवर बिनय कुमार बिस्वाव आणि मानिकताला जागेवर कल्याण चौबे यांना उतरवलं आहे.
सोमवारी काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या चार विधानसभा जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर आणि नालागढ मतदारसंघातून डॉ. पुप्षेंद्र वर्मा आणि हरदीप सिंह बावा यांना उमेदवारी दिली गेली आहे. उत्तरखंडच्या बद्रीनाथ आणि मंगलौर मतदारसंघामधून लखपत बुटोला आणि काजी निजामुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे.
या विधानसभा मतदारसंघात 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. शुक्रवारी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाली होती. याचबरोबर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारखी 21 जून आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. मतमोजणी 13 जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. आज (सोमवार) भाजपकडून महाराष्ट्राच्या प्रभारी पदी भूपेंद्र यादव(Bhupendra patel) यांची नियुक्ती केली गेली आहे. तर, अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी पदी नियुक्ती केली आहे.
लोकसभेमध्ये महाराष्ट्रात झालेल्या पराभवामुळे भाजपकडून मोठे संघटनात्मक बदल केले जातील, याचे संकेत दिले जात होते. प्रभारी पदी यादव यांची नियुक्ती करून त्याची सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रासोबत हरियाणाची विधानसभा निवडणूक होणार आहे. हरियाणासाठी देखील निवडणूक प्रभारी म्हणणारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान Dharmendra Pradhan यांची नियुक्ती केली आहे. तर, बिप्लब कुमार देब सहप्रभारी असणार आहे.
झारखंड आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यासाठी झारखंडच्या प्रभारी पदी शिवराजसिंह चौहान यांची तर, हेमंत विश्व सरमा यांची सहप्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची जम्मू काश्मीरच्या प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.