BJP Congress Sarkarnama
देश

Assembly Bypolls 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून काल लोकसभा, चार राज्यांतील विधानसभा आणि देशभरातील विधानसभेच्या 26 मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Rajanand More

New Delhi News : देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून चार राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीचा धुरळाही उडणार आहे. त्याचप्रमाणे देशभरातील विधानसभेच्या 26 मतदारसंघाची पोटनिवडणूकही (Assembly Bypolls 2024) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतली जाणार आहे. या निवडणुकांनंतर काँग्रेसची एका राज्यातील सत्ता जाणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. 

निवडणूक आयोगाकडून (Election Commission) हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या सहा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मागील महिन्यात राज्यसभा निवडणुकीदरम्यान (Rajya Sabha Election) काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे या सहा जागांवर निवडणूक होत आहे.

राज्यसभा निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस (Congress) सरकार कोसळणार असल्याची स्थिती निर्माण झाली होती. भाजपकडून (BJP) बहुमत चाचणीची मागणीही करण्यात आली होती. सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेससमोर संकट उभे ठाकले होते.

विधानसभेत बजेट मंजूर करतानाच सरकारला नाकीनऊ येऊ शकते, असे लक्षात आल्यानंतर सरकारकडून भाजपच्या काही आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे इतर सदस्यांनीही वॉकआऊट केले. त्यामुळे सरकारवरील संकट तात्पुरते टळले. आता सहा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीत विजय मिळविणे काँग्रेससाठी महत्वाचे मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 तर भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या सहा आमदारांसह तीन अपक्षांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. आता हे सहा जण अपात्र ठरल्याने काँग्रेसचे संख्याबळ 34 पर्यंत खाली आले आहे. या सर्व ठिकाणी भाजपने बाजी मारल्यास पक्षाचे संख्याबळ तीन अपक्षांसह 34 वर पोहचेल.

काँग्रेसमधील काही आमदार नाराज आहे. तेही भाजपला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसला सर्व सहा जागांवर पुन्हा विजय मिळवणे महत्वाचे मानले जात आहे. अन्यथा सरकार संकटात येऊ शकते. याबाबत विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनीही तसे संकेत दिले आहेत. या निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT