Assembly Election 2024 Sarkarnama
देश

Assembly Election 2024 : आयोगाकडून मोठी चूक; चोवीस तासांत बदलली निकालाची तारीख

Election Commission : निवडणूक आयोगाने काल चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभेसोबत या निवडणुकाही होणार आहेत.

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशात सात टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तर चार जून रोजी मतमोजणी होईल. अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभा निवडणुकाही लोकसभेसोबतच असतील. पण या तारखा जाहीर करताना आयोगाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.

आयोगाने (Election Commission) अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणूक 19 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. तर काल जाहीर केल्याप्रमाणे मतमोजणी 4 जून रोजी घेतली जाणार होती. पण दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 2 जून रोजीच संपणार आहे. तर आयोगाच्या वेळापत्रकानुसार मतमोजणी त्यानंतर दोन दिवसांनी होती.

आयोगाकडून झालेली ही चूक आज सुधाण्यात आलेली आहे. त्यानुसार आयोगाने या राज्यांतील मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून ऐवजी 2 जून रोजी होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाही याचदिवशी पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाकडून म्हटले आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमधील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही, असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशातील निवडणुकाही नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

असा आहे लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम -

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्याचे 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्याचे 7 मे, चौथ्या टप्प्याचे 13 मे, पाचव्या टप्प्याचे 20 मे, सहाव्या टप्प्याचे 25 मे आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकांचे निकाल होतील.

देशभरात कोणत्या टप्प्यात किती मतदारसंघ ?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार असून, 102 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 89 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार असून, त्यामध्ये 96 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 49 जागांवर, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 57 जागांवर आणि 01 जून रोजी सातव्या टप्प्यांत 57 जागांवर मतदान होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT