तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री Udhayanidhi Stalin (DMK) हे फक्त ३०० मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात AIADMK कडून आदि राजाराम तर Vijay यांच्या TVK पक्षाकडून डी. सेल्वम रिंगणात आहेत. सध्या डी. सेल्वम दुसऱ्या क्रमांकावर असून मुकाबला अत्यंत टोकाचा बनला आहे.
केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या रोचक चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री N. Rangasamy यांच्या नेतृत्वाखालील AINRC आघाडीने किमान ७ जागांवर आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणारे रंगासामी थट्टनचावडी मतदारसंघातून सुमारे ३,५९१ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष पुन्हा सत्ता राखण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेस-प्रणीत आघाडीची कामगिरी सुधारताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर Shashi Tharoor यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
थरूर म्हणाले, “पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या निकालांनी मला आश्चर्य वाटले. पण केरळमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनामुळे आनंद झाला आहे. राज्यात बदलाची गरज होती.” मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “CM कोण होणार याचा अंतिम निर्णय पक्षाचे आलाकमान घेईल.”
आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. ताज्या रुझानांनुसार भाजप ६६ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या आकड्यापेक्षाही पुढे गेली आहे. त्यामुळे आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता कायम राहण्याची शक्यता बळावली आहे.
दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९ जागांवर आघाडीवर असून सत्तेसाठी आवश्यक अंतर अजून खूप मोठे आहे. सध्याचे ट्रेंड पाहता एक्झिट पोलचे अंदाज जवळपास खरे ठरताना दिसत आहेत.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या रुझानांमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या Vijay यांच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाने दमदार कामगिरी करत ७८ जागांवर आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे, सध्याचे मुख्यमंत्री M. K. Stalin आपल्या मतदारसंघात पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील DMK पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत असून पक्ष फक्त ४३ जागांवर आघाडीवर आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार DMK तिसऱ्या क्रमांकावर घसरताना दिसत आहे.
सुरुवातीच्या कलांनुसार UDF आघाडीने 58 जागांवर आघाडी घेतली आहे, तर सत्तारूढ LDF फक्त 22 जागांवर पुढे आहे. याशिवाय NDA आघाडीनेही 7 जागांवर आघाडी मिळवली आहे, त्यामुळे केरलच्या राजकारणात चुरस वाढताना दिसत आहे.
या निवडणुकीत एकूण 883 उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वांचे राजकीय भविष्य आज ठरणार आहे. सध्या Pinarayi Vijayan यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा ऐतिहासिक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, UDF आपली गमावलेली राजकीय ताकद पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर NDA राज्यात आपले खाते उघडण्याच्या आशेने मैदानात उतरले आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील 'एलडीएफ' (LDF) सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून इतिहास घडवणार की, दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची केरळची जुनी परंपरा राखत काँग्रेस प्रणित 'यूडीएफ' (UDF) बाजी मारणार, याचे चित्र आज स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.