PFI News :  sarkarnama
देश

PFI News : 'एटीएस'ने 'पीएफआय'चा 'मोठा कट' उधळला : काय होती भारताविरूद्ध योजना?

PFI News : आरएसएस ही सवर्ण हिंदूसाठी काम करते, याचाच आधार घेत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम पीएफआय करणार होते.

सरकारनामा ब्यूरो

PFI News : महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दावा केला आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवू इच्छित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्याची त्यांची योजना आहे. एटीएसने गेल्या आठवड्यात पाच पीएफआय सदस्यांविरुद्ध स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात एटीएसने पीएफआयची कटकारस्थानचा उलगडा केला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गेल्या वर्षी या संघटनेवर बंदी घातली होती.

महाराष्ट्र एटीएसने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये छापा टाकून पाच पीएफआय सदस्यांना अटक केली होती. एटीएसने मजहर खान, सादिक शेख, मोहम्मद इक्बाल खान, मोमीन मिस्त्री आणि आसिफ हुसेन खान यांना अटक करून तुरुंगात रवानगी केली.

2 फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, एटीएसने "इंडिया 2047 - भारतात इस्लामचे शासन" नावाचे दस्तऐवज जप्त केल्याचा दावा केला आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेल्या दस्तऐवजाने पीएफआय सदस्यांना आताचे सरकार पाडण्याचा आणि 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र घोषित करण्याची योजना दिसून आली. यासाठी भारतातील मुस्लिमांना फितवण्याचा प्रकारही होता, असे या दस्तावेजात म्हटले आहे.

आरोपपत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही केवळ सवर्ण हिंदूंच्या कल्याणासाठी झटणारी संघटना आहे. याचाच आधार घेऊन हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम पीएफआयने आपल्या सदस्यांना दिले होते.

आपला उद्देश साध्य करण्यासाठी आरोपींनी अनेकवेळा यासाठी प्रशिक्षण घेतल्याचे एटीएसने म्हटले आहे. याचे प्रशिक्षणही त्यांनी अनेकांना दिले होते. आरोपपत्रात असा दावाही करण्यात आला आहे की, आरोपींकडून महाराष्ट्रात संघटना विस्तार करण्याच्या योजना आ

एटीएसने दावा केला आहे की, पीएफआय आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परदेशातून शस्त्रे आणि दारूगोळा मिळविण्याच्या योजनेवर काम करत आहे.भारतात बंदी येण्यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्था (NIA), अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पीएफआयवर मोठ्या प्रमाणात छापे टाकले होते. त्यातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT