RSS Stand on Ram Mandir Donation: अयोध्येच्या राम मंदिरातीली देणगी घोटाळ्यावर अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मौन तोडलं आहे. हा घोटाळा बाहेर येऊन आता दहा ते पंधरा दिवस होतील त्यानंतर आत्ता आरएसएसचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे यावर भाष्य केलं आहे. घोटाळा उघड होऊन इतके दिवस झाले त्यात मोठ्या कारवाया झाल्या तरी अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसनं यावर मौन बाळगल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
व्हिडिओ संदेशात हेसबळे म्हणतात, पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षामुळं आणि लाखो रामभक्तांच्या समर्पण, त्याग व भक्तीमुळं श्री राम जन्मभूमीवर बांधलेले भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी आदर, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. अयोध्या येथील श्री राम लल्ला मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा केलेल्या निधीच्या चोरीच्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला धक्का बसला आहे आणि या घटनेमुळं आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी झालो आहोत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष तपास पथक स्थापन केलं असून त्याच्या शिफारशींच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तपासात दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह संपूर्ण हिंदू समाजाची स्वाभाविक अपेक्षा आहे की, ट्रस्टने या अत्यंत निंदनीय घटनेला हलक्यात घेऊ नये, तसंच व्यवस्थापन आणि प्रशासनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून अयोध्या मंदिरातील लाखो रामभक्तांची श्रद्धा आणि भक्ती अबाधित व अढळ राहील. सध्याची गोंधळाची आणि अनिश्चिततेची स्थिती संपुष्टात आलीच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.
या संदर्भात, मंदिर व्यवस्थापन आणि सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सर्व आवश्यक पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे. आमचा विश्वास आहे की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट योग्य आर्थिक व्यवस्थापन, सुरळीत कामकाजासाठी निर्दोष आणि पारदर्शक प्रणाली तसेच पवित्रता, पावित्र्य आणि धर्माने परिपूर्ण वातावरणाच्या माध्यमातून हिंदू समाजाची श्रद्धा आणि विश्वास कायम राखेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाजाला आवाहन करतो की, या कठीण काळात आवश्यक संयम आणि धैर्य दाखवावे आणि या दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करण्याचे हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचे कट उधळून लावावेत, असंही दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.