Dhananjay Singh Sarakranama
देश

Dhananjay Singh News : उत्तर प्रदेशमधील बाहुबली धनंजय सिंह यांनी भाजपला जाहीर केला पाठिंबा!

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहे. तर पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

धनंजय सिंह यांनी आपले सहकाऱ्यासोबत चर्चेनंतर सांगितले की, मी भाजपला साथ देणार आहे. मी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना साथ देणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मला माहीत आहे की आज माझ्यासोबत जे लोक आहेत, त्यांचा कल भाजपच्या बाजूने आहे. जनभावनेचा सन्मान करत मी भाजपचे(BJP) समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काही दिवसांत माझी पत्नी श्रीकला सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करू शकते. जर तिने भाजपमध्ये प्रवेश केला तर तो तिचा वैयक्तिक निर्णय़ असेल, माझा काहीही आक्षेप नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वीच बसपाने जौनपूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय सिंह(Dhananjay Singh) यांची पत्नी श्रीकला रेड्डी यांना उमेदवारी रद्द करून, विद्यमान खासदार श्याम सिंह यादव यांना उमेदवारी दिली होती. खरंतर बसपा नेत्यांनी दावा केला होता की, श्रीकला रेड्डी यांनी स्वत:च त्यांची उमेदवारी मागे घेतली होती. तर धनंजय सिंह यांचे म्हणणे होते की, बसपाने त्यांच्या पत्नीचं तिकीट कापलं आहे.

तर बसपाने(BSP) तिकीट कापल्यानंतर श्रीकला रेड्डी म्हणाल्या होत्या की, सरकारं आणि पक्ष आमच्यामुळे आहे, आम्ही त्यांच्यामुळे नाही. जौनपुरकर असताना कोणही माझे मनोबल कोणी तोडू शकत नाही. त्या म्हणाल्या होत्यी की, मला माहीत आहे तुम्ही सर्वजण उदास आहे. परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण दुप्पट ताकदीने सेवा करू.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT