Baba Siddique Murder Case Sarkarnama
देश

Baba Siddique Murder Case : ...तर बाबा सिद्दीकी यांचा जीव वाचला असता! चार्जशीटमध्ये महत्वाचे खुलासे

Mumbai Police Chargesheet Bishnoi Gang : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तब्बल 4 हजार 590 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे.

Rajanand More

Mumbai News : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक महत्वाचे खुलासे समोर आले आहेत. हत्येचे नियोजन कसे, कुठे झाले, रेकी कुणी केली, हत्येचा दिवस, प्लॅन ए, प्लॅन बी... अशा अनेक बाबींचा खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्यादिवशी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन फसला असता तर पुन्हा असा प्रयत्न झाला नसता, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी तब्बल 4 हजार 590 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. मागीलवर्षी 12 ऑक्टोबरला रात्री सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपींच्या चौकशीची महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींना त्यादिवशी सिद्दीकींचा हत्या करता आली नसती तर त्यांनी हत्येचा प्लॅन सोडून दिला असता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, तसे झाले नाही.

अनेक दिवस बाबा सिद्दीकी यांची रेकी केल्यानंतर निराश झाल्याचे आरोपींनी पोलिसांनी सांगितले आहे. त्यादिवशी सिद्दीकींवर हल्ला करता आला नसता तर पुन्हा हत्येचा प्रयत्न करणार नव्हतो, असे आरोपींनी म्हटले आहे. हत्येनंतर पोलिसांपासून बचावासाठी पेपर स्प्रेचा वापर करण्याचा त्यांचा प्लॅन होता. गुलमेल सिंह यांनी त्याचा वापरही केला होता. पण त्यानंतर त्याच्यासाठी धर्मराज कश्यपला पोलिसांनी पकडले होते. तर शिवकुमार गौतम पळून गेला होता. त्याला काही दिवसांनी अटक करण्यात आली.

दोन महिने केली रेकी

आरोपपत्रात म्हटले आहे की, हत्येपूर्वी आरोपींनी सिद्दीकी यांची दोन महिने रेकी केली होती. तीन हल्लेखोरांनी तीन ते चार वेळा सिद्दीकी यांचे घर आणि कार्यालयाची रेकी केली होती. रेकी करत असताना ते स्वत:जवळ एका बॅगेत पिस्तूलही घेऊन यायचे. संधी मिळेल तेव्हा हल्ला करण्याचे त्यांचा विचार होता, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

आणखी एका हत्येचा प्लॅन फसला

सिद्दीकींच्या हत्येच्या षडयंत्रामध्ये सहभागी असल्याच्या कारणास्तव पुण्यातून अटक करण्यात आलेले रुपेश मोहोळ आणि गौरप अपुने यांनी फरार आरोपी शुभम लोणकरसोबत मिळून माजी पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा प्लॅन केला होता. पण गुन्हे शाखेने त्याआधीच त्यांच्या ताब्यात घेतले. जयदीप भोंडकरच्या हत्येमध्ये अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश अल्चा संशय दोघांना होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT