Baban Shinde Sarkarnama
देश

Baban Shinde Arrested : 'सौ चूहे खा के बिल्ली चली..' ; महाराष्ट्रात तब्बल 300 कोटींचा घातला गंडा अन् मथुरेत जाऊन बनला साधू!

Baban Shinde Arrested from Vrindavan : बीड जिल्ह्याशी आहे कनेक्शन? ; अटक टाळण्यासाठी साधूच्या वेशात लपून राहत होता.

Mayur Ratnaparkhe

Beed Crime Story : महाराष्ट्रात हजारो लोकांची तब्बल 300 कोटींपेक्षाही अधिक रुपयांची फसवणूक करून, मथुरेत जाऊन साधू बनलेल्या एकास पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हा महाठग मथुरेत साधूच्या वेशात दडून बसला होता. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तो आपली अटक टाळण्यासाठी साधूच्या वेशात येथे लपून बसला होता.

तर वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितले की, बबन विश्वनाथ शिंदेला वृंदावन आणि बीड जिल्हा पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून कृष्ण-बलराम मंदिराजवळून अटक करण्यात आली आहे. एका पोलिस(Police) अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे हा जवळपास 300 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील अनेक प्रकरणात वाँटेड होता.

पोलिस उपाधीक्षक संदीप कुमार सिंह यांनी म्हटले की, 'शेकडो जणांची फसवणूक करणारा शिंदे, एका साधूच्या वेशात दिल्ली, आसाम, नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये दडून राहत होता. जेणेकरून पोलिस त्याला पकडू शकणार नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, अखेर तो वृंदावनात दडून बसलेला आढळला.'

आरोपीला मंगळवारी रात्री उशीरा अटक केली गेली आणि शिंदेला दुसऱ्या दिवशी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातील गुन्हे शाखेच्या एका टीमने मथुरा न्यायालयातून ट्रांजिट रिमांड प्राप्त केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

बीड(Beed) जिल्ह्याचे एसएसपी अविनाश बारगळ यांच्या मार्फत गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे सदस्य पोलिस उपनिरीक्षक एसएस मुरकुटे यांच्या मते, शिंदेने लोकांना त्यांच्या ठेवीवर मोठ्याप्रमाणात व्याज देण्याचे आमीष दाखवले होते आणि त्यांना राज्याच्या सहकारी बँकांच्या चार शाखांमध्ये पैसे गुंतवण्यास लावले.

मुरकुटे यांनी सांगितले की, आरोपीकडून करण्यात आलेल्या एकूण फसवणुकीत, चोरीच्या पैशाने खरेदी केलेल्या संपत्तीचाही समावेश आहे. फसवणूक प्रकरणातून आरोपीने तब्बल दोन हजारांपेक्षाही अधिक जणांचे आयुष्य उध्वस्त केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT