Rahul Gandhi, Pratap Sarangi Sarkarnama
देश

Parliament Winter Session : मोठी बातमी : संसदेत भाजप खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत; राहुल गांधींना धक्काबुक्की

Parliament Protests on Ambedkar Issue : अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून त्यांची राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Rajanand More

New Delhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्य विधानावरून विरोधकांनी गुरूवारीही संसद दणाणून सोडली. मात्र, आज भाजपच्या खासदारांनीही काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन केले. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यानंतर धक्काबुक्कीचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. यात भाजपच्या एका खासदारांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने आपण पडल्याचे दावा खासदारांनी केला आहे. प्रताप चंद्र सारंगी असे या खासदारांचे नाव आहे. संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत असताना राहुल गांधींनी एका खासदारांना धक्का दिला. हे खासदार आपल्या अंगावर आल्याने आपण पडलो आणि त्यामुळे डोक्याला दुखापत झाल्याच दावा सारंगी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. उलट भाजप खासदारांनी आपल्यालाच धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. भाजप खासदार संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. आपण आतमध्ये जात असताना अडवण्यात आले आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

दरम्यान, सारंगी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सारंगी यांना दुखापत झाल्यानंतर राहुल गांधीही त्यांना पाहण्यासाठी तिथे आले होते. यावेळी भाजपचे खासदार निशीकांत दुबे चांगलेच संतापले होते. ही काय गुंडागर्दी आहे, असा सवाल त्यांनी राहुल यांना केला. त्यावर राहुल यांनीही आपण काहीही केले नसल्याचे सांगितले.

काँग्रेसकडून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांसह आवारातही आंदोलन करण्यात आले. अमित शाह यांनी माफी मागावी तसेच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भाजप खासदारांनीही काँग्रेस विरोधात आंदोलन केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT