Mayawati, Danish Ali Sarkarnama
देश

MP Danish Ali : भाजपशी पंगा घेणाऱ्या खासदार दानिश अली यांची बसपामधून हकालपट्टी

Bahujan Samaj Party : भाजपचे खासदार रमेश बिदुरी यांनी दानिश अली यांच्याविरुद्ध लोकसभेत आक्षेपार्ह विधान केले होते.

Rajanand More

Mayawati News : बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांची शनिवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका असून, त्याआधीच पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दानिश अली यांना धक्का दिला आहे.

बसपाचे (BSP) राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांनी अली यांना पत्र पाठवून पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही पक्षाची विचारधारा, धोरणांच्या विरुद्ध जाऊन कोणतीही वक्तव्य किंवा कृत्य करू नयेत, असे तुम्हाला अनेकदा तोंडी सांगितले आहे, पण त्यानंतर तुम्ही सातत्याने पक्षविरोधी कारवाया करत आहात.

भाजपचे (BJP) खासदार रमेश बिदुरी यांनी दानिश अली यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. याची चर्चा देशात झाली आणि बिदुरी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अली यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची लोकसभेतून हकालपट्टी केल्यानंतर अली यांनी एकट्यानेच शुक्रवारी संसदेच्या आवारात आंदोलन केले. त्यांनी कारवाईविरोधात गळ्यात फलक अडकवला होता.

महुआ मोईत्रा संसदेच्या आवारात माध्यमांशी संवाद साधत असताना सोनिया गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. दानिश अलीही जवळच उभे होते. या वेळी महुआ यांनी दानिश अली यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावरून भाजपवर टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अली यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 (Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT