Former President Mohammad Abdul Hamid captured at Dhaka Airport before fleeing to Thailand amid political turmoil.  Sarkarnama
देश

Bangladesh Crisis : भारत-पाकमध्ये संघर्ष सुरू असतानाच बांग्लादेशचे माजी राष्ट्रपती पळाले; पहाटे लुंगीवरच गाठले थायलंड...

Background of Mohammad Abdul Hamid's Presidency : माजी राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांनी मंगळवारी पहाटे ढाका विमानतळावरून थाई एअरवेजच्या विमानातून थेट थायलंड गाठले आहे.

Rajanand More

Bangladesh's Political Landscape : भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून मोठा संघर्ष सुरू आहे. शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांतील तणाव कमी होत असतानाच भारताच्या शेजारील बांग्लादेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बांग्लादेशच्या माजी राष्ट्रपतींनी संपूर्ण देश गाढ झोपेत असताना पहाटे तीन वाजताच पलायन केल्याचे वृत्त आहे.

माजी राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांनी मंगळवारी पहाटे ढाका विमानतळावरून थाई एअरवेजच्या विमानातून थेट थायलंड गाठले आहे. या प्रकाराने खडबडून जागे झालेल्या बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने तातडीने काही अधिकाऱ्यांना निलंबित काहींच्या बदल्या केल्या करून उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

 माजी राष्ट्रपती हमीद यांच्यावर बांग्लादेशातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर केलेल्या अत्याचाराचा आरोप आहे. त्यांची चौकशीही सुरू आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हे आंदोलन झाले होते. त्यानंतर त्यांनाही देश सोडून पळून जात भारतात आश्रय घ्यावा लागला. त्या अजूनही भारतातच असल्याचे सांगितले जात आहेत. त्यातच माजी राष्ट्रपतीही अंतरिम सरकारच्या तावडीतून निसटले आहेत.

विशेष म्हणजे, ढाका विमानतळावर प्रवेश करताना ते व्हीलचेअरवर बसले होते आणि त्यांनी लुंगी परिधान केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे ते वेशभूषा बदलून गेल्याचीही चर्चा आहे. अब्दुल हमीद हे 2013 पासून तब्बल दहा वर्षे राष्ट्रपती होती. 2024 च्या आंदोलन काळात सरकारच्या निर्णयांची चौकशी सुरू असून यामध्ये हसीना यांच्यासह हमीद यांच्यावरही खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमीद पळून गेल्यानंतर अंतरिम सरकारने शिक्षण सल्लागार सीआर अब्रार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. दरम्यान, हमीद यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ते त्यांचा भाऊ आणि मेव्हण्यासोबत वैद्यकीय उपचारासाठी गेले आहेत. पण त्यांचे राजकीय विरोधक मात्र पळून गेल्याचा दावा करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT