Sheikh Hasina: बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यामुळे भारत धर्मसंकटात सापडण्याची चिन्ह आहे. गेल्या वर्षी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता.
बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी शेख हसीना यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. यूनूस यांच्या पोलिस प्रशासनाने याबाबत मोठा प्लॅन आखला आहे. बांग्लादेश पोलिसांच्या नॅशनल क्राईम ब्युरोने (एनसीबी) इंटरपोलकडे 12 जणांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस काढण्याची मागणी केली आहे. यात शेख हसीना यांचे नाव आहे.
77 वर्षीय शेख हसीना या गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी बांग्ला देशातून भारतात आल्या होत्या. बांग्लादेशातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करीत त्यांचे 16 वर्षांचे सरकार पाडलं होते. शेख हसीना यांच्यासह या 12 जणांवर विविध तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपांच्या आधारे एनसीबीने इंटरपोलकडे हा अर्ज केला आहे. एनसीबीचे सहायक महानिरीक्षक (माध्यम) एनामुल हक सागर यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे.
विदेशात पळून गेलेल्या आरोपींना शोधण्याचे काम इंटरपोल ही तपास यंत्रणा करीत असते. त्याबाबतची माहिती संबधीत अधिकाऱ्यांना देत असते. मोहम्मद यूनुस हे बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख बनल्यानंतर काही दिवसात बांग्लादेश आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायाधिकरणाने (ICT) शेख हसीना आणि त्यांचे अनेक मंत्री, सल्लागारांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना पकडण्याचे वारंट बजावले आहे. आयसीटीचे अधिकाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याचा सल्ला दिला होता.
21 जानेवारी रोजी बांग्लादेशातील अंतरिम सरकारने शेख हसीना यांना भारतातून परत आणण्याची मागणी केली होती. शेख हसीना यांना आमच्याकडे सोपवा, यासाठी बांग्लादेशातील अंतरिम सरकार भारतावर दबाव आणत आहे. त्यांच्या प्रत्यापर्णासाठी भारताने नकार दिला आहे.
युनूस यांच्या धोरणावर भारत नाराज आहे. युनूस हे पाकिस्तान आणि चीनच्या धोरणाला पाठिंबा देत भारताच्या धोरणाला विरोध करीत आहेत. अशात जर इंटरपोलने शेख हसीना यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस पाठवली तर भारत समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.