Shiv Sena latest news sarkarnama
देश

Shiv Sena : बंडखोर आमदार राठोडांचे समर्थक सुनील महाराज शिवसेनेत ; ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

Shiv Sena : दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवीलाही मी जरूर जाईन,” असे ठाकरे म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्यात सत्तात्तर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेला गळती सुरु होत असताना आता बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (sunil maharaj) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी हाती शिवबंधन बांधलं.

याआधीही सुनील महाराज यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आज त्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदार संजय राठोडांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागले.

“आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण यांना जेव्हा लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेना प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे याचं भवितव्य घडवण्याची. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवीलाही मी जरूर जाईन,” असे ठाकरे म्हणाले.

"आज सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला आनंद आहे. आपण म्हणत होतो की साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा. आता नवरात्रीतच सुनील महाराज इथे आले आहेत," असे ठाकरे म्हणाले.

शिवसेवा संकल्प दौरा काढणार..

सुनील महाराज म्हणाले, “आमदार संजय राठोडांसोबत आम्ही होतो. आता आम्ही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत. ठाकरेंना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकरलं आहे. आम्ही महाराष्ट्रात दौरा करणार आहोत. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा पूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे शिवसेवा संकल्प दौरा काढणार आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT