Karanatak Politics :
Karanatak Politics : 
देश

Karnataka Politics : महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंची गच्छंती होणार ?

सरकारनामा ब्युरो

Karnataka News : देशातील आगामी नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी मोठी बैठक पार पडली. भाजपने कर्नाटक राज्याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे.

याचे कारण म्हणजे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली.येडियुरप्पा यांचा पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीमुळे चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनलेल्या येडियुरप्पा यांचे नशिब पालटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यांच्या या भेटीमुळे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची गच्छंची होण्याची चर्चाची राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

कर्नाटकमध्ये येत्या मे २०२३ पासून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजप नेतृत्वाने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची नियुक्ती केली होती. पण येडियुरप्पा यांच्या नंतर बसवराज बोम्मई चांगल्या कामांपेक्षा चुकीच्या कामांमुळे जास्त चर्चेत राहिले. बोम्मई यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या काही मंत्र्यांचे डाग धुवावे लागले आहेत. त्यामुळे बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागू शकते असेही बोलले जात आहे.

गेल्या वर्षी बोम्मई यांचे सरकार असताना फारशी कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरले. विरोधकांनी सातत्याने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या विरोधात विरोधकांनी PayCM अशी मोहिमेमुळे बोम्मई यांनी पक्ष नेतृत्वाची नाराजी ओढावून घेतली. तरीही भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने यात कोणताही बदल करण्यास सरळ नकार देत कर्नाटकची निवडणूक बोम्मई यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया येत्या 4 महिन्यांत सुरू होणार आहे. कर्नाटककडेही पक्ष नेतृत्वाचे विशेष लक्ष आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपची सत्ता आहे. येडियुरप्पा हे कर्नाटकातील लिंगायत समाजाचे समर्थन असलेले भाजपचे मोठे नेते आहेत. पण पक्षात त्यांची संख्या कमी आहे.

कर्नाटकच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपने येडियुरप्पा यांना संसदीय मंडळात स्थान दिले आहे. भाजपचे संसदीय मंडळ सर्व महत्त्वाचे निर्णय घेते. यामध्ये उमेदवारांच्या तिकिटापर्यंत पक्षाकडून निर्णय घेतले जातात. येडियुरप्पा यांना या बोर्डावर घेणे म्हणजे कर्नाटकातील तिकीट ठरवताना येडियुरप्पांचे ऐकले जाणार, असा याचा अर्थ होतो

तर दुसरीकडे, भाजपचे मुख्य रणनीतीकार अमित शहा यांनी कर्नाटक भाजपला "मिशन 136" दिले आहे. म्हणजेच कर्नाटक भाजपला 224 जागांपैकी 136 पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवायच्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस भाजपला तगडे आव्हान देत आहे. कर्नाटक हे अशा काही राज्यांपैकी एक आहे जिथे काँग्रेसला आजही तळागाळातून पाठिंबा मिळतो.

काँग्रेस आणि एचडी कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर यांच्या आमदारांच्या पलायनानंतर युतीचे सरकार कोसळले. कर्नाटकमध्ये सत्तांतर झाले आणि भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर आली. सत्ताधारी आघाडीने भाजपने घोडेबाजार करत ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT