Sanjay Raut Kirit Somaiya Sarkarnama
देश

राऊतांच्या पत्रकार परिषदेपुर्वीच किरीट सोमय्यांनी टाकला डाव

Sanjay Raut | Shivsena | Press conference : किरीट सोमय्या करेक्ट कार्यक्रमाच्या तयारीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज संध्याकाळी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून त्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोकं तुरूंगात जाणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. आम्ही खूप सहन केले. आता आम्हीच तुम्हाला बरबाद करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मात्र आता संजय राऊत यांच्या याच पत्रकार परिषदेपुर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मैदानात उतरले असून ते करेक्ट कार्यक्रमाच्या तयारीत आहेत असे म्हणावे लागेल.

आज सकाळी ११ वाजता किरीट सोमय्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात "COVID सेंटर कंपनी" आणि ठाकरे सरकार यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या ठाकरे सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच त्यासाठी तपास यंत्रणांकडे पाठपुरावा देखील करत आहेत. त्यानंतर ते आज नुसते आरोप करुन न थांबता पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करणार आहेत.

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता

दरम्यान शिवसेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे संपुर्ण महाराष्ट्रासह केंद्रीतील नेत्यांचेही लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे उपस्थित राहणार नाहीत. मात्र शिवसेनेचे इतर बडे नेते, आमदार, खासदार किल्ला लढवणार आहेत. याबाबत बोलताना शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले, पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, खासदार सगळे जमणार आहेत. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण शिवसैनिक स्वतः उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलवत नाही.

राज्यात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, काय-काय केलं जातंय, नेत्यांवर दबाव टाकला जातोय. त्याबाबत उद्या सर्वजण बोलतील. उद्या कोण कोणाच्या रडारवर आहे ते कळेल. जनतेसमोर, सरकारसमोर प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. लोकांना कळेल काय चाललंय, असं देसाई यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT