RCB Rally Sarkarnama
देश

RCB Stampede update : IPS हेमंत निंबाळकरांची तडकाफडकी बदली; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवांचीही उचलबांगडी

Bengaluru Stampede: Political and Administrative Fallout : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय सचिवांची उचलबांगडी केली आहे. के. गोविंदराजू हे त्यांचे राजकीय सचिव होते.

Rajanand More

Siddaramaiah’s Political Secretary Dismissed : बेंगलुरू येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने थेट काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर आसूड ओढले आहेत. तर पोलिसांनी याप्रकरणी आरसीबीसह इव्हेंट मॅनेटमेंट कंपनीतील चौघांना अटक केली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे.

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय सचिवांची उचलबांगडी केली आहे. के. गोविंदराजू हे त्यांचे राजकीय सचिव होते. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर शुक्रवारी त्यांना पदावरून हटविण्यात आले. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख हेमंत निंबाळकर यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

के. गोविंदराजू हे राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. आरसीबीच्या विजयी रॅलीचे विधानभवन परिसरात आयोजन करण्याबाबत त्यांनीच मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याची चर्चा आता होत आहे. यापार्श्वभूमीवर त्यांना पदावरून हटविल्याचे सांगितले जात आहे. यांसह चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सरकारने तातडीने अनेक पावले उचलली आहेत.

पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूसह डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आज सकाळी चार जणांना अटकही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे गुरूवारी बेंगलुरूच्या पोलिस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भाजपने याप्रकरणी राज्य सरकारला टार्गेट केले आहे. सरकारकडून पोलिसांना बळीचा बकरा केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर पलटवार करताना कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई केल्याचे स्पष्ट केले. भाजप या घटनेचे राजकारण करत आहे. मी राजकारण करणार नाही. प्रत्यक्ष घटनेला जबाबदार होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT