Bhagwant Mann & Arvind Kejriwal Sarkarnama
देश

भगवंतसिंग पंजाबचे नवे किंग; आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा केला दारूण पराभव...

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) मोठा विजय मिळवला आहे.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाहेर प्रथमच आम आदमी पक्षाचे (AAP) पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. आज लागलेल्या निकालातून आम आदमी पक्षाने काँग्रेस, (Congress) भाजप, अकाली दल या सर्वांना धुळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान (Bhagwant Singh Mann) यांनी सुमारे 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसला पछाडले आहे. तर, नवज्योत सिद्दू, कॅप्टन अमरिंदर सिंह, चरणजित चन्नीसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे.

दिल्लीनंतर आपच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद या निकालाने झाली आहे. पंजाबमध्ये मोठी उलथापालथ झाली असून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आम आदमी पक्ष आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. या निकालाने देशातील प्रमुख पक्षांना म्हणजे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर प्रस्थापित नेत्यांना पंजाबच्या जनतेने नाकारल्याचे चित्र आहे. आपच्या लाटेत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, आजी मुख्यामंत्री चरणजित चन्नीसह मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धूला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आपच्या पंजाब विजयात महत्वाची भूमिका बजावणारे आणि आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांच हे मोठ यश मानलं जात आहे. मान हे राजकारणात येण्याआधी एक प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. त्यांच्या या ओळखीचाही आपला फायदा झाला असून ते पंजाबच्या जनतेला विकासाचा अजेंडा दाखव यशस्वी ठरले आहे. मान यांची आधीच पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती. गतवेळी म्हणजे 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपला केवळ 20 जागेवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला 77 जागेवर यश मिळाले होते. यावेऴी काँग्रेसला मोठा झटका बसला असून सुमारे 60 जागा गमावल्या आहेत. तर आपने 70 जागेंची बढत मिळवत काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये प्रथमच आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असून शपथविधी हा शहिद भगतसिंग यांच्या जन्मगावी होणार असून सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्याचा फोटो लावला जाणार नसल्याचे मान यांनी जाहीर केले आहे. आपच्या विजयाचा जल्लोष देशभरातील आप कार्यकर्ते करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT