देश

Bharat Jodo Yatra News Update : श्रीनगरच्या लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला तिरंगा

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra News Update : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अखेर आज (29 जानेवारी ) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला आणि राष्ट्रगीत गायले. यावेळी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथून निघालेली भारत जोडो यात्रा 137 दिवसांत 4,080 किमी अंतर कापत काश्मीरमध्ये पोहचली. उद्या या यात्रेचा शेवटचा दिवस आहे.

लाल चौकात तिरंगा फडकवल्यानंतर राहुल गांधी लगेच निघून गेले. मात्र, यानंतर येथे उपस्थित स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. लाल चौकात उपस्थित असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, समाजात द्वेष वाढत असताना राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला. तिरस्कार सोडून भारत जोडा या यात्रेच्या माध्यमातून, देशाच्या अखंडतेशी खेळणाऱ्याला काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही, हा त्यांना एक संदेश द्यायचा होता.

हरियाणातील काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा म्हणाले की, आज देशाने देश एक असल्याची भावना दाखवून दिली आहे. धर्म, जात, भाषा यांच्याही वर देश एक आहे ही भावना दाखवून दिली. भारत जोडा म्हणजेच द्वेष सोडून एकमेकांना प्रेमाने जोडा. शेतकऱ्यांना सन्मानाने एमएसपी हमीसह जोडा, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) शी जोडा… ही आमची घोषणा आहे.

दरम्यान, 1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनीही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल चौकात तिरंगा फडकवला होता. त्यांच्यासोबत तत्कालीन जम्मू-काश्मीर संस्थानाचे प्रमुख शेख अब्दुल्लाही होते. या घटनेनंतर प्रदीर्घ काळानंतर 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT