Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra  
देश

Bharat Jodo Yatra : यात्रेतून पोलीस गायब; राहुल गांधींनी थांबवलेली पदयात्रा पुन्हा सुरु; नक्की काय झाले होते?

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra News : सुरक्षेच्या कारणास्तव कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वत: पुरती भारत जोडो यात्रेत चालणे थांबवले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा राहुल गांधींनी आपली पदयात्रा सुरु केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या मुलीसह राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

यात्रेत स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सामील झाले होते. शुक्रवारी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत चालणे थांबवले होते. राहुल गांधी यांच्यासोबत काल अनेक लोक यात्रेत चालत होते. पण अचानक पोलीस सुरक्षा व्यवस्था ठप्प झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी यांनी ही यात्रेत चालणे स्वत: पुरते थांबवले होते.

काझीगुंडला पोहोचल्यानंतर राहुल यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार दक्षिण काश्मीरमधील वेसूच्या दिशेने पदयात्रा सुरू केली. जम्मू-काश्मीर पोलिसांकडे राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. पण आनंतनागमध्ये भारत जोडो यात्रेतील पोलीस बंदोबस्त पूर्णपणे कोलमडला. गर्दीचे व्यवस्थापन करणारे पोलीस अचानक गायब झाले. पोलिसांच्या सुरक्षेशिवाय यात्रेत चालणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आनंतनाग येथून यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

"स्थानिक पोलिसांकडून यात्रेतील सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार राहुल गांधी यांनी केली. तसेच, यात्रेदरम्यान होणाऱ्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे माझी सुरक्षा करणाऱ्या लोकांनी मी यापुढे यात्रेत सहभागी होणे धोक्याचे ठरू शकते, असा सल्ला दिल्यानंतर मी यात्रेत चालणे थांबवले. अशी प्रतिक्रीया राहुल गांधी यांनी यावेळी दिली. पण आज सकाळी त्यांची सुरक्षा व्यवस्था पुर्ववत झाल्यानंतंर त्यांनी आपली यात्रा पुन्हा सुरु केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT