Charan Singh, PV Narasimha Rao and MS Swaminathan  Sarkarnama
देश

Bharat Ratna : मोठी बातमी : नरसिंह राव, चरणसिंह आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली.

Rajanand More

New Delhi : केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासह प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली. (Bharat Ratna)

सरकारने काही दिवसांपूर्वीच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.  चौधरी चरणसिंह यांना अनेक वर्षांपासून भारतरत्न देण्याची मागणी होत होती.

पंतप्रधान मोदींनी (Pm Narendra Modi) भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करताना चरणसिंह (Charan Singh) यांच्याविषयी म्हटले आहे की, हा सन्मान देशासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि कल्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी सतत राष्ट्रनिर्माला गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही उभे राहिले. शेतकरी बांधवांसाठीचा त्यांचे समर्पण आणि आणीबाणीवेळी लोकशाहीसाठी त्यांची भावना संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव (PV Narsimha Rao) यांच्याविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले, एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकीय नेता नेता म्हणून त्यांनी भारताची मोठ्या प्रमाणात सेवा केली. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात, देशाची समृध्दी आणि विकासासाठी एक मजबूत पाया रचला गेला. भारताला जागितक बाजारपेठ खुली करण्यासह त्यांनी पंतप्रधान असताना महत्वपूर्ण पावले टाकली. त्यामुळे आर्थिक विकासाच्या एका नव्या युगाला सुरूवात झाली. त्याचप्रमाणे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले.

भारताला स्वावलंबी बनवले 

शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वामीनाथन (MS Swaminathan) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा हा सन्मान आहे. आश्वानात्मक स्थितीत भारतीय शेतीला स्वावलंबी बनविण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. तसेच भारतीय शेतीला आधुनिक बनविण्यातही त्यांचा मोठा वाटा होता, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT