Bhartrihari Mahtab sarkarnama
देश

Bhartrihari Mahtab News: लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे भर्तृहरी महताब; राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Bjp Politcal News : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे भर्तृहरी महताब यांची नियुक्ती केली. येत्या काळात नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत सुरुवातीचे दोन दिवस लोकसभेच कामकाज भर्तृहरी महताब पाहणार आहेत.

Sachin Waghmare

New Delhi News : अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांनी भाजपचे भर्तृहरी महताब यांची नियुक्ती केली. येत्या काळात नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत सुरुवातीचे दोन दिवस लोकसभेच कामकाज भर्तृहरी महताब पाहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या सर्व खासदारांना शपथ देखील तेच देणार आहेत. त्यासोबतच नव्या अध्यक्षांची निवड देखील भर्तृहरी महताब यांच्याच समोर केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजाजू यांनी दिली. ( Bhartrihari Mahtab News)

भर्तृहरी महताब हे ओडिशातील भाजप खासदार आहेत. कटक मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून आले आहेत. घटनेच्या कलम ९९ नुसार नव्याने निवडून आलेल्या सर्व खासदारांना शपथ देखील तेच देणार आहेत. त्यांच्या सॊबत अन्य पाच जण खासदारांना शपथ देण्याचे काम करणार आहेत.

नवीन लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत भर्तृहरी महताब हेच हंगामी अध्यक्ष राहणार आहेत. हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

SCROLL FOR NEXT