Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman  Sarkarnama
देश

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात पॅन कार्ड संदर्भात मोठी घोषणा; अर्थमंत्री म्हणाल्या...

सरकारनामा ब्यूरो

India Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिले बजेट असल्याचे सीतारमन यांनी यावेळी सांगितले. सीतारमण यांनी बजेटमध्ये पॅनकार्डसंदर्भात मोठी घोषणा केली.

तुम्ही पॅन कार्डचा वापर करत असाल, तर पॅन कार्ड (PAN Card) घरी ठेवण्याची आवश्यकता नाही. पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आल्याची घोषणा सीतारमण यांनी यावेळी केली.

सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पॅनकार्डला एक नवीन ओळख दिली आहे. आता ओळखपत्र म्हणून तुम्ही पॅनकार्डचा वापर करु शकणार आहेता. व्यवसायाची सुरुवात सुद्धा पॅनकार्डने होऊ शकते, असेही सितारमन यांनी स्पष्ट केले.

आयकर विभागाकडून (Income Tax Department) देशात प्रत्येक व्यक्तीसाठी पॅनकार्ड जारी केले जाते. इन्कम टॅक्स भरण्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे असते. त्यामध्ये आता त्याला नवीन ओळख देण्यात आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न, म्युचअल फंड आणि लोनसाठी अर्ज करताना पॅनकार्ड खूप महत्त्वाचे असते.

अनेक गोष्टींसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे असते. काही गोष्टींसाठी पॅनकार्ड बंधनकारक असते. इनकम टॅक्स रिर्टन, म्युचअल फंड गुंतवणूक, लोन तसेच पॅनकार्ड जारी करण्याचा उद्देश आर्थिक माहिती ठेवण सुद्धा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT