Sachin Pilot
Sachin Pilot  Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसचा सचिन पायलट यांना झटका; स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळलं

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. काँग्रेसने आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

देशातील तब्बल 40 बड्या नेत्यांची फौज काँग्रेस कर्नाटकच्या निवडणुकीत उतरवणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही दोन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

तर दुसरीकडे नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव या यादीत आहे. तर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांचे नाव या यादीत नाही. त्यामुळे पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यामध्ये असलेल्या मतभेदामुळे त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नसावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार मोर्चेबांधणी करत असून काँग्रेससाठी अवघड वाटणाऱ्या मतदारसंघात एकएका नेत्याची नियुक्ती केली आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला कर्नाटकचा गड जिंकायचा आहे, असा निर्धारच काँग्रेसने केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेचा निकाल महत्वाचा ठरणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT