Congress News Sarkarnama
देश

Congress News: काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; मुंबई, गुजरातसह पद्दुचेरीतही खांदेपालट

Mumbai : काँग्रेसने भाकरी फिरवली, केले मोठे बदल

सरकारनामा ब्यूरो

Political News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अॅक्शन मोडवर आलं असून काँग्रेस हायकमांडने मुंबई, गुजरात आणि पद्दुचेरी काँग्रेसमध्ये मोठे बदल केले आहेत. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या जागी आता वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल केला असल्याची चर्चा आहे. याबरोबरच गुजरात आणि पद्दुचेरीमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

गुजरात काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता खासदार शक्तिसिंह गोहिल (Shakti Singh Gohil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेस नेते दीपक बावरिया यांना दिल्ली काँग्रेस आणि हरियाणा काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले आहे.

याबरोबरच पद्दुचेरीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार व्ही.वैथीलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जगदीश ठाकोर हे गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष तर पुद्दुचेरी काँग्रेसचे अध्यक्ष एव्ही सुब्रमण्यम हे जबाबदारी सांभाळत होते. याबाबतच्या माहितीचे पत्र काँग्रेस महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी जारी केले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे फेरबदल केले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता आगामी निवडणुकीच्या अनुंषगाने मोठ्या हालचाली सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT